पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, नंतर समजलं ते शिवसेनेचे : अजित पवार

आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंके यांना बोलावून सांगितलं, असं अजित पवार म्हणाले.

पारनेरच्या नगरसेवकांना अपक्ष म्हणून प्रवेश, नंतर समजलं ते शिवसेनेचे : अजित पवार

मुंबई : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली, मात्र राजकीय वर्तुळात शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी असल्याची थांबलेली नाही. या संपूर्ण प्रकरणावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन सोडले आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असा दावा अजितदादांनी केला. (Ajit Pawar on Shivsena Parner Corporators entering NCP and Return)

‘सारथी’वरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

“मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहनं आली. तिथे आमदार निलेश लंके आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे. मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले. कार्यक्रम झाला आणि मग मला कळलं की, ते शिवसेनेचे होते.” असं अजित पवार म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“मी निलेश लंकेंना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीने घेतलं नाही, तर आम्ही भाजपात जाऊ… आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंके यांना बोलावून सांगितलं.” असंही अजित पवार पुढे म्हणाले.

हेही वाचा : शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?

“त्या नगरसेवकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पाठवलं. तुमच्यावर काही अन्याय झाला असेल, किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल, ते तुमचे वरिष्ठ सोडवतील, असं त्यांना सांगितलं. या बाबतीत कधीही मुख्यमंत्री नाराज नव्हते. ते मला कधीही काही बोलले नाहीत. माध्यमांनीच ते नाराज असल्याचं दाखवलं” असा दावाही अजित पवार यांनी केला.

संबंधित बातम्या 

सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा

(Ajit Pawar on Shivsena Parner Corporators entering NCP and Return)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *