नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण

Namrata Patil

|

Updated on: Jun 12, 2020 | 7:24 PM

नागपूर महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांची सफाई करवून घेतली. शहरातील 582 किमी नाल्यांपैकी 537 किमी सफाई पूर्ण झाली. (Nagpur Drainage Line Clean Work)

नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण
Follow us

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. लॉकडाऊनचा सदुपयोग करत नागपूर महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांची सफाई करवून घेतली. नागपूर शहरातील 582 किमी नाल्यांपैकी 537 किमी सफाई पूर्ण झाली. (Nagpur Drainage Line Clean Work)

नागपुरात पावसाळ्यात अनेकदा रस्त्यावर पाणी जमा होते. यंदा पावसाचे पाणी जमा होऊ नये, त्याचा सहजतेने निचरा व्हावा यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाले सफाईंच्या कामाचे आदेश दिले होते. या निर्देशानुसार पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात एवढया मोठया प्रमाणात नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार 10 झोनमधील रस्त्यालगत 582.84 किमीपैकी आतापर्यंत 537.17 किमी पावसाळी नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 45.67 किमीची सफाई सुरु केली आहे. येत्या काही दिवसात ती पूर्ण होणार आहे.

नागपूर शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला, फुटपाथलगत असलेल्या नाले बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे नागपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. लॉकडाऊनमुळे फुटपाथ आणि रस्तेही मोकळे असल्याने याचा स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरले.

विशेष म्हणजे, पावसाळी नाल्यांच्या सफाईकरिता मनपाला कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागला नाही. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी आणि ऐवजदारांमार्फत दहा झोनमध्ये हे कार्य सुरू आहे. या स्वच्छता कार्यांतर्गत आरसीसी बॉक्स ड्रेन आणि आरसीसी पाईप ड्रेनची संपूर्ण सफाई मनुष्यबळाद्वारे केली जात आहे. यामधून माती आणि इतर कचरा काढून ते पावसाळ्याच्या पाण्याचा सुरळीत निचरा व्हावा यासाठी मोकळे करण्याचे काम सुरु आहे.

महापालिकेने वेळेचा सदुपयोग करत नागरिकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी केला. तसेच खर्चाची बचत सुद्धा केली. त्यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मात्र नेमकी काय परिस्थिती उद्भवते ते मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होईल. (Nagpur Drainage Line Clean Work)

संबंधित बातम्या : 

विदर्भात पेरणीला सुुरुवात, शेतकऱ्यांकडून बियाणांची खरेदी, सोयाबीनकडे कल जास्त

Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI