अंतिम वर्षातील परीक्षांना ग्रहण, नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या

आता नागपूर विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. (Nagpur University Exam Postpone after technical issue) 

अंतिम वर्षातील परीक्षांना ग्रहण, नागपूर विद्यापीठात तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या
Namrata Patil

|

Oct 10, 2020 | 9:00 AM

नागपूर : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या ऑनलाईन परीक्षेला ग्रहण लागले आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षेत काही दिवसांपूर्वी तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नागपूर विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे त्या विषयाची परीक्षा नंतर घेतली जाईल, असे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. (Nagpur University Exam Postpone after technical issue)

काल (9 ऑक्टोबर) झालेल्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान रिमोर्ट सर्वरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे परीक्षा होऊ शकली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील रविवारी किंवा अन्य योग्य तारखेला घेण्यात येतील, असे परिपत्रक नागपूर विद्यापीठाने जाहीर केल्या आहेत.

नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु झाली. काल 9 ऑक्टोबरला डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. मात्र विद्यापीठाच्या ऑनलाईन अॅपचं सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर ही परीक्षा पुढे ढकललण्यात आली आहे.

नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु होती. जवळपास 70 हजाराहून अधिक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेसाठी बसले होते. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांच अशाप्रकारे ऑनलाईन परीक्षा घेतली जात होती. त्यामुळे नागपूर विद्यापीठासह विद्यार्थ्यांसमोरही तांत्रिक बाजू सांभाळण्याचं मोठं आव्हान होतं.

हेही वाचा – ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला, मुंबई विद्यापीठाने आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे ऐन परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली होती.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेला 3 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली होती. या परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला हा सायबर हल्ला झाला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने हे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 आणि बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र 1 व सत्र 2 या परीक्षाचे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.(Nagpur University Exam Postpone after technical issue)

संबंधित बातम्या :(Nagpur University Exam Postpone after technical issue) 

मुंबई विद्यापीठ सायबर क्राईममध्ये तक्रार करणार : प्रदीप सावंत

मुंबई विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षांची तारीख जाहीर, परीक्षा मंडळाकडून घोषणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें