AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : नांदेडमध्ये ‘आळंदी पॅटर्न’, शहरात अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही

आळंदी येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निम्मीताने लाखो भाविक येत असतात. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मगर यांनी तिथे बॅरिकेट्स लावून गर्दी नियंत्रणात ठेवली होती.

Corona : नांदेडमध्ये 'आळंदी पॅटर्न', शहरात अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही
| Updated on: Apr 20, 2020 | 9:52 AM
Share

नांदेड : जिल्ह्यात आजवर एकही कोरोना रुग्ण (Nanded Corona Free) आढळून आलेला नाही. दोन वेगवेगळ्या राज्याच्या सीमा आणि राज्यातील पाच जिल्ह्याच्या सीमेवर नांदेड जिल्हा आहे. या सगळ्या सीमांवर पोलिसांनी आळंदी पॅटर्न ठेवलेल्या बंदोबस्तामुळे जिल्हा आजपर्यंत कोरोना मुक्त (Nanded Corona Free) राहिलेला आहे.

कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वीच नांदेडमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून विजयकुमार मगर यांनी पदभार स्वीकारला होता. मगर यांनी यापूर्वी आळंदी इथे सेवा देत असताना बंदोबस्ताचा आपला स्वतःचा असा एक पॅटर्न तयार केला होता. आळंदी येथे आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निम्मीताने लाखो भाविक येत असतात. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मगर यांनी तिथे बॅरिकेट्स लावून गर्दी नियंत्रणात ठेवली होती.

बंदोबस्ताचा हाच आळंदी पॅटर्न त्यांनी लॉकडाऊनच्या काळात नांदेडमध्ये वापरला. जिल्ह्यातील सगळ्या सीमा, मुख्य रस्ते बॅरिकेट्स लावत बंद केल्यामुळे बाहेरुन जिल्ह्यात कुणीही येऊ शकलेलं नाही. यासोबतच त्यांनी शहरात देखील बॅरिकेट्स लावत लोकांना घरात राहण्यास प्रेरणा दिली. त्यामुळे नांदेडमध्ये काही अपवाद वगळता (Nanded Corona Free) लॉक डाऊन पूर्णपणे यशस्वी झाला आहे.

विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जवळपास 77 हजार प्रवासी बाहेरुन नांदेड जिल्ह्यात आले. मात्र, त्या सर्वांना होम क्वारंन्टाईन करण्यात आलं आहे. या होम क्वारंटाईन केलेल्या लोकांवर देखील पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या वाहन धारकांकडून नांदेड जिल्ह्यात तब्बल दीड कोटी रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. त्यामुळे हुल्लडबाजी नियंत्रित झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग फैलावला नाही.

जिल्ह्यात आजवर 327 संशयितांचे नमुने तपासण्यात आले असून त्यात एकालाही कोरोनाची लागण नाही. पोलिसांच्या बंदोबस्तामुळेच कोरोनाचा ‘वाहक’ जिल्ह्यात येऊ शकला नाही. पोलिसांच्या बंदोबस्ताचा हा सापशिडीचा प्रयोग राज्यात इतरत्रही वापरण्यात आला. दरम्यान, त्यामुळेच नांदेड सध्या तरी कोरोना मुक्त जिल्हा आहे, याचे श्रेय पोलिसांच्या आळंदी पॅटर्न बंदोबस्ताला जाते. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या या कामाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.

जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधीनी आपल्या बंदोबस्ताला पाठिंबा दिला. त्यामुळेच हे यश मिळाल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे. त्यासोबतच जिल्ह्यात आरोग्य सेवा देणाऱ्या विभागाने या काळात प्रचंड सहकार्य केल्याचे मगर यांनी सांगितले. नांदेड जिल्हा हा करोना मुक्त असण्याच्या यशामागे कुण्याही एकाचे प्रयत्न नसून सर्वच यंत्रणेची त्यासाठी मोलाची मदत झाल्याचे पोलीस अधीक्षक मगर यांनी नमूद केलय. मात्र मगर यांचा आळंदी धर्तीवरचा बंदोबस्त सध्या नांदेडमध्ये (Nanded Corona Free) मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे.

संबंधित बातम्या :

Corona : उस्मानाबाद जिल्हा ‘कोरोनामुक्त’, तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

पालघरमध्ये जमावाकडून तिघांची हत्या, आरोपींना कडक शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Lockdown : अखेर ऊसतोड कामगार त्यांच्या गावी रवाना होणार!

धक्कादायक! क्वारंटाईनसाठी दिलेल्या शिक्क्यांची शाई निकृष्ट, पाण्याने धुवून लोक घराबाहेर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.