नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार

Yuvraj Jadhav

|

Updated on: Nov 18, 2020 | 11:18 AM

नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन जो बायडन यांना फोनवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांमधील ही पहिली बातचीत होती. (Narendra Modi calls Jo Biden to congratulate for victory in US Election)

नरेंद्र मोदी-जो बायडन यांच्यात फोन पे चर्चा, भारत अमेरिका एकत्रितपणे जागतिक आव्हानांशी लढणार
जो बायडन नरेंद्र मोदी

Follow us on

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्याशी फोनवर संवाद साधला. नरेंद्र मोदींनी यावेळी जो बायडन यांना निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. जो बायडन यांनीही नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. मोदी-बायडन यांच्यात यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी याबाबतट ट्विटद्वारे माहिती दिली आहे. (Narendra Modi calls Jo Biden to congratulate for victory in US Election)

नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जो बायडन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध  मजबूत करणे आणि कोरोना विषाणू, जागतिक आव्हाने याविषयी देखील चर्चा झाली. जो बायडन यांचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा बायडन यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला.

कोरोना विषाणू, जलवायू परिवर्तन, हिंदी आणि पॅसिफिक महासागरातील दोन्ही देशांमधील सहकार्य आणि आगामी काळातील आव्हानं याबाबत मोदी- बायडन यांनी चर्चा केली.

नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या कमला हॅरिस यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत. कमला हॅरिस यांचे यश भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक दोन्ही देशांमधील संबंध मजबूत होण्यासाठी महत्वाचे आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

जो बायडन यांनी कोरोना विषाणू, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणे, हिंदी आणि पॅसिफिक महासागरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे, अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे, असं सांगितले.

8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी

अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये 8 डिसेंबरपर्यंत मतमोजणी सुरु राहणार आहे. यावर्षी मतमोजणी प्रक्रियेला अनेक ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. 538 इलेक्ट्रोल कॉलेजचे निकाल तयार केले जातील त्यानंतर ते अधिकृत रित्या अमेरिकेच्या काँग्रेसकडे सोपवले जातील.

अधिकृतपणे निकालांची घोषणा अमेरिकेच्या काँग्रेसचे अधिवेशन येत्या जानेवारी महिन्यात 6 तारखेला आयोजित केले जाईल. विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स अधिकृतपणे निवडणुकीचे निकालांची घोषणा करतील.

संबंधित बातम्या :

जो बायडन ओसामा बिन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते; बराक ओबामांचा मोठा गौप्यस्फोट

अमेरिकेच्या नियोजित अध्यक्षांकडून भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा, जो बायडन म्हणाले…

(Narendra Modi calls Jo Biden to congratulate for victory in US Election)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI