च्यवनप्राश घ्या, तंदुरुस्त व्हा, नंतर घराबाहेर पडा, मनसेचा नाशिकच्या महापौरांना सल्ला

मनसेच्या वतीने सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राशची बॉटल भेट देण्यात आली आहे. (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni)

च्यवनप्राश घ्या, तंदुरुस्त व्हा, नंतर घराबाहेर पडा, मनसेचा नाशिकच्या महापौरांना सल्ला
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 8:58 PM

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाने अक्षऱश: थैमान घातलं  आहे. अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरु आहे. असे असतानाही नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी मात्र घरात बसून आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. तसेच मनसेच्या वतीने सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राशची बॉटल भेट देण्यात आली आहे. (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni)

नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारच्या पार पोहोचला आहे. तर मृत्यूंचा आकड्यातही वाढ होत आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र या ठिकाणचे महापौर कोणत्याही रुग्णालय, कोविड सेंटरला भेट देत नाहीत. तसेच, बाहेरही पडत नाही. त्यामुळे नाशिककरांना आधार कसा मिळणार असा प्रश्न मनसेच्या वतीन करण्यात आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्यामुळे मनसेने नाशिकच्या महापौरांना च्यवनप्राश दिले आहे. “महापौरांनी च्यवनप्राश घ्या, तंदुरुस्त व्हा. त्यानंतरच नागरिकंच्या कामासाठी घराबाहेर पडा,” असा खोचक सल्ला मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांना दिला (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni) आहे.

नाशिकमध्ये 7 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 4 हजार 209 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. त्यात नाशिक शहर आता कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni) आहे.

संबंधित बातम्या : 

Nashik Curfew | नाशिक शहरात पुन्हा संचारबंदी, संध्याकाळी सातनंतर बाहेर पडल्यास कारवाई

नाशिक महापालिका आयुक्त हायरिस्कमध्ये, स्वीय सहाय्यकाला कोरोना, जिल्हा परिषदेतही शिरकाव

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.