विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा, मुंबईत बढती मिळण्याची शक्यता

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. IPS Vishwas Nangare Patil

विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा, मुंबईत बढती मिळण्याची शक्यता

नाशिक : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नांगरे पाटलांच्या बदलीची अद्याप अधिकृत माहिती नसली, तरी कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची चर्चा आहे. (IPS Vishwas Nangare Patil)

डॅशिंग IPS म्हणून नांगरे पाटील यांची ओळख आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही नांगरे पाटील यांच्या बदलीचे संकेत दिले. मात्र अधिकृत अशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही. (IPS Vishwas Nangare Patil)

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

विश्वास नांगेर पाटील यांची फेब्रुवारी 2019 मध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नाशिकचे तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या जागी नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्याआधी नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

विश्वास नांगरे पाटलांनी आईला भीक मागायला लावणारी मुलं शोधली!

नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये कोरोनाचं मोठं संकट असतानाही, कायदा सुव्यवस्था राखण्यात नांगरे पाटील यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळते की त्यांना पदोन्नती मिळून मुंबईत त्यांची सहआयुक्तपदी बदली होते याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.

कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?

महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले आणि पोलिस सेवेते धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरुड हे त्यांचे मूळ गाव. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. स्पर्धा परीक्षा करुन पोलिस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे विश्वास नांगरे पाटील हे रोल मॉडेल आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत कोणती पदं भूषवली?

  • लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
  • पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • मुंबई पोलीसदल उपायुक्त
  • ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
  • अप्पर(अतिरिक्त -) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
  • पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
  • पोलीस आयुक्त – नाशिक

संबंधित बातम्या  

IPS विश्वास नांगरे पाटील यांची बदली 

Liquor Shop | आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश 

Published On - 1:18 pm, Sat, 18 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI