राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी, तब्बल 6 पुरस्कारांची नोंद

याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. (National Water Award Maharashtra get second best award in water management)

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी, तब्बल 6 पुरस्कारांची नोंद
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 9:34 AM

नवी दिल्ली : जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. जलसंपत्ती नियमनात राज्याने दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले आहे. यातील विविध क्षेत्रात राज्याला एकूण 6 पुरस्कार मिळाले आहेत. (National Water Award Maharashtra get second best award in water management)

यात सांगली जिल्ह्याला नदी पुनरूज्जीवनासाठी पुरस्कार मिळाला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड जिल्ह्यांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाच्या कार्याचा गौरव केला जातो. याच पार्श्वभूमीवर नुकतंच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. यावेळी विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्राला एकूण 6 पुरस्कार मिळाले आहेत.

जलसंपत्ती नियमनात महाराष्ट्र देशात पुन्हा अग्रेसर

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात देशातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय जल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यातील उपलब्ध जलसंपत्तीचे न्यायोचित, समन्यायी व टिकाऊ वितरण व व्यवस्थापन यासाठी ‘महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा, 2005’ अन्वये जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन झालेले आहे. राज्यातील भू-पृष्ठावरील उपलब्ध जलसंपत्तीचे तसेच भू-जलाचे हे प्राधिकरण नियमन करते.

प्राधिकरणाने स्वायत्तपणे जनहितार्थ घेतलेले निर्णय, त्यांच्या अंमलबजावणीने जलक्षेत्रात झालेला सकारात्मक परिणाम, अधिनियमाने विहित केलेल्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी, पाण्याचा काटेकोर वापर, जल प्रदूषणावर नियंत्रण, सांडपाण्याचा पुनर्वापर यासाठी केलेली जनजागृती या सर्व निकषांचा विचार करुन केंद्र शासनाने देशातील ‘सर्वोकृष्ट जल नियमन प्राधिकरण’ या संवर्गातील प्रथम पुरस्कारासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सलग दुसऱ्यांदा निवड केली आहे.

नदी पुनरूज्जीवनात सांगली जिल्हा देशात पहिला

तर नदी पुनरूज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला नदीच्या पुनरूज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

याशिवाय अमरावती जिल्हयातील शरद पाणी वापर ठिबक सिंचन सहकारी सोसायटीला सर्वोत्कृष्ट पाणी वापर संस्थेचा पहिला तर नाशिक जिल्हयातील दिंडोरी येथील वाघाड प्रकल्पाला या श्रेणीमधे दुसऱ्या क्रमांकांचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.  (National Water Award Maharashtra get second best award in water management)

संबंधित बातम्या : 

मिठाईवर ‘तयार करण्यात आलेली तारीख’ आणि ‘एक्सपायरी डेट’ दोन्हीही तारखा आवश्यक : अन्न-औषध प्रशासन मंत्री

अर्थसंकल्पीय अधिवशेन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय देणार, नाना पटोलेंची माहिती

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.