AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Case | अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड, वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात

एनसीबी कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.

Drugs Case | अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड, वाहनचालक पोलिसांच्या ताब्यात
| Updated on: Nov 09, 2020 | 1:09 PM
Share

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्ष अर्थात एनसीबीकडून अभिनेता अर्जुन रामपालच्या घराच्या आसपासच्या परिसरात धाड टाकण्यात आली आहे (NCB Raid Arjun Rampal). तसेच या कारवाई दरम्यान अर्जुन रामपालच्या वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे (NCB conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai).

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.

एनसीबीची धडक कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) रविवारी (8 नोव्हेंबर) मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती.

बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले. बॉलिवूडशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले होते (NCB conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai).

निर्मात्याच्या घरात ड्रग्जचा साठा

रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली.

एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते. (NCB conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai)

ड्रग्ज प्रकरणात अर्जुनच्या मेहुण्याचे नाव

या आधी एनसीबीने अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सच्या भावाला ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याचे नाव समोर आल्याने अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सला अटक करण्यात आली असल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण अफिकेचा नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस एनसीबी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात होता. त्याचे नाव समोर आल्याने त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

(NCB conducts raid at the premises of actor Arjun Rampal in Mumbai)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.