हाथरस घटनेवरील जनतेची रिअॅक्शन योग्यच; पवारांची योगी सरकारवर टीका

उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता?, याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. म्हणून हाथरस प्रकरणावर जनतेची रिअॅक्शन उमटत आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

हाथरस घटनेवरील जनतेची रिअॅक्शन योग्यच; पवारांची योगी सरकारवर टीका

मुंबई: हाथरस येथील घटनेतील पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. (sharad pawar reaction on hathras gang rape)

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार देशात कधी घडला नाही. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. माणूसकीच्या दृष्टीकोनातूनही पोलिसांनी असं वागायला नको होतं. त्यामुळे देशातील जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून जनतेची रिअॅक्शन ही योग्यच आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता?, याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. म्हणून हाथरस प्रकरणावर जनतेची रिअॅक्शन उमटत आहे, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले. (sharad pawar reaction on hathras gang rape)

संबंधित बातम्या:

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं

(sharad pawar reaction on hathras gang rape)

Published On - 4:23 pm, Fri, 2 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI