हिममानव ‘येती’बाबत नेपाळ सैन्याचा नवा दावा

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने काही दिवसांपूर्वी हिममानव ‘येती’ अस्तित्त्वात असल्याचा दावा केला होता. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी भारतीय सैन्याने ट्विटर हँडलवरुन काही फोटोही शेअर केले होते. मात्र भारतीय सैन्याचा दावा नेपाळच्या सैन्याने खोडून काढला आहे. अशा प्रकारच्या पाऊल खुणा अनेकदा हिमालयात दिसल्या आहेत. या खुणा जंगली अस्वलाच्या आहेत, असं नेपाळच्या सैन्याने म्हटलं आहे. काही […]

हिममानव 'येती'बाबत नेपाळ सैन्याचा नवा दावा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने काही दिवसांपूर्वी हिममानव ‘येती’ अस्तित्त्वात असल्याचा दावा केला होता. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी भारतीय सैन्याने ट्विटर हँडलवरुन काही फोटोही शेअर केले होते. मात्र भारतीय सैन्याचा दावा नेपाळच्या सैन्याने खोडून काढला आहे. अशा प्रकारच्या पाऊल खुणा अनेकदा हिमालयात दिसल्या आहेत. या खुणा जंगली अस्वलाच्या आहेत, असं नेपाळच्या सैन्याने म्हटलं आहे.

काही दिवासांपूर्वी बर्फावर अवाढव्य पायांचे ठसे दिसले होते. हे पाय हिममानवाचेच आहेत, असा दावा भारतीय सैन्याने केला होता. “भारतीय सैन्याच्या टीमने 9 एप्रिल 2019 रोजी पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ 32×15 इंचाचे हिममानव ‘येती’च्या पायांचे रहस्यमय फोटो पाहिले.” असे भारतीय सैन्याने ट्वीटमध्ये म्हटलं होते.

हिममानव ‘येती’चे रहस्य

हिममानव ‘येती’ हिमालयातील सर्वात रहस्यमय प्राणी आहे. हिममानवाबद्दल लोकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, हिममानव आता नाहीत. तर काहींचे म्हणणे आहे की, हिममानव फक्त पुराण कथांमध्ये आहे. हिममानव एक सर्व सामान्य माणसासारखा, उंच, अस्वलासारखा दिसतो आणि केसांनी संपूर्ण शरीर झाकलेले असते.

वैज्ञानिक घेणार शोध

भारतीय सैन्य लवकरच सर्वांसमोर हिममानव ‘येती’ संबधित फोटो आणि व्हिडीओ समोर आणेल. आतापर्यंत हिममानवाबद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत. मात्र आता त्याच्या अस्तित्वाचे फोटो समोर येऊ शकतात. यापूर्वीही नेपाळच्या माऊंट मकालू पर्वतामध्ये हिममानव ‘येती’ दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण याबद्दलचे काही पुरावे कुणाकडे नाहीत. आता वैज्ञानिक भारतीय सैन्याच्या या दाव्यावर शोध घेणार आहे.

संबधित बातम्या : 

मानवाचा वंशज ‘येती’च्या पाऊलखुणा दिसल्या, भारतीय सैन्याचा दावा

हिममानव ‘येती’ खरंच जिवंत? भारतीय सैन्याकडून फोटो प्रसिद्ध

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.