हिममानव 'येती' खरंच जिवंत? भारतीय सैन्याकडून फोटो प्रसिद्ध

नवी दिल्ली : हिममानव ‘येती’ अस्तित्त्वात असल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी भारतीय सैन्याने ट्विटर हँडलवरुन काही फोटोही शेअर केले आहेत. बर्फावर अवाढव्य पायांचे ठसे दिसत असून, हे पाय हिममानवाचेच आहेत, असा दावा भारतीय सैन्याने केला आहे. “भारतीय सैन्याच्या टीमने 9 एप्रिल 2019 रोजी पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ 32×15 इंचाचे हिममानव …

हिममानव 'येती' खरंच जिवंत? भारतीय सैन्याकडून फोटो प्रसिद्ध

नवी दिल्ली : हिममानव ‘येती’ अस्तित्त्वात असल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी भारतीय सैन्याने ट्विटर हँडलवरुन काही फोटोही शेअर केले आहेत. बर्फावर अवाढव्य पायांचे ठसे दिसत असून, हे पाय हिममानवाचेच आहेत, असा दावा भारतीय सैन्याने केला आहे. “भारतीय सैन्याच्या टीमने 9 एप्रिल 2019 रोजी पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ 32×15 इंचाचे हिममानव ‘येती’च्या पायांचे रहस्यमय फोटो पाहिले.” असे भारतीय सैन्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘येती’ काय आहे?

‘येती’ हा जगातील सर्वात रहस्यमय प्राणी मानला जातो. अनेकदा ‘येती’ला पाहिल्याचे दावे केले जातात. जम्मू-काश्मीरमधील लडाखच्या काही बौद्ध मठांनी ‘येती’ला पाहिल्याचा दावा केला होता. मात्र, संशोधकांच्या मते पोलर बियर प्रजातीतील ‘येती’ 40 हजार वर्षांपूर्वी अस्तित्त्वात होते. काही संशोधकांच्या मते, ‘येती’ अस्वलीच्या प्रजातीतील आहेत, जे हिमालयात राहतात. मात्र, कुठल्याही संशोधकांचे ‘येती’बाबत एकमत आढळून येत नाही.

पौराणिक कथांमध्ये ‘येती’ प्राण्याचा उल्लेख आढळतो. नेपाळ, लडाख आणि तिबेट या परिसरातील हिमायल क्षेत्रात ‘येती’चा वावर असल्याचे पौराणिक कथांमधून सांगितलं जातं. सर्वसामान्य माणसापेक्षा उंच, अस्वलीसारखे अंगावर केस असं एकंदरीत ‘येती’चं रुप असल्याचे म्हटलं जातं. ‘येती’च्या ओरडण्याचा आवाज अत्यंत भयंकर असल्याचे बोलले जाते. 1925 साली एका जर्मन फोटोग्राफरने ‘येती’ला पाहिल्याचा दावा केला होता. त्यानंतर सातत्याने कुणी ना कुणी ‘येती’ला पाहिल्याचा दावा करत आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *