ठरलं! 11 नोव्हेंबरला नवी Kia Sonet लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

किया मोटर्स कंपनी त्यांच्या किया सोनेट या SUV चं नवं व्हर्जन 11 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे.

ठरलं! 11 नोव्हेंबरला नवी Kia Sonet लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 12:01 AM

क्वालालंपूर : Kia Motors ची Kia Sonet ही SUV भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. कंपनी आता या SUV चं नवं व्हर्जन 11 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. नव्या व्हर्जनमध्ये ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही मोठ्या साईजमध्ये सादर केली जाणार आहे. (New Kia Sonnet to be launched on november 11 with great features)

किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आता कंपनी या एसयूव्हीचं नवं व्हर्जन लाँच करणार आहे. किया सोनेटचं नवी व्हर्जन मलेशियामध्ये लाँच केलं जाणार असून या कारची लांबी भारतात लाँच केलेल्या किया सोनेटपेक्षा 125mm अधिक असेल. कंपनी ही कार 70 देशांमध्ये लाँच करणार आहे.

Kia Sonet चं इंजिन आणि फिचर्स

या कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये रिफाइन्ड 1.5 CRDi डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, जे 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 100 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. तर दुसरं इंजिन 115 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. सोबतच यामध्ये G1.0 T-GDi पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे जे 120 PS इतकी पॉवर जनरेट करु शकतं. हे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह देण्यात आलं आहे.

मायलेज आणि स्पीड

7DCT सह किया सोनेटचं मायलेज 18.3 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. iMT सह किया सोनेटचं मायलेज 18.2 किलोमीटर प्रति लीटर इतकं आहे. 6MT डिझेल सोनेट 24.1 किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. तर 6AT सोनेट 19 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

या कारमध्ये तुम्हाला इमरजन्सी स्टॉप सिग्नल, रियर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, डुअल एयरबॅग्स आणि ईबीडीसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. किआ सोनेटमध्ये तुम्हाला 10.67cm कलर कलस्टर आणि 26.03cm टचस्क्रीन, स्मार्ट प्युअर एयर प्युरिफायरसह व्हायरस प्रोटेक्शन, फ्रंट वेंटिलेटेड सीट्स, मल्टी ड्राईव्ह मोड्स आणि एमटी रिमोट इंजिन स्टार्टसारखे अनेक फिचर्स मिळतील. या कारची एक्स शोरुम किंमत 6.71 लाख ते 11.99 लाख रुपयांपर्यंत आहे.

एका महिन्यात किया सोनेटच्या 11,721 युनिट्सची विक्री

किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ही कार भारतीय नागरिकांच्या पसंतीस उतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात या कारच्या तब्बल 11 हजार 721 युनिट्सची विक्री झाली आहे.

कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात आमच्या 21 हजार 21 कार्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये किया सोनेटचे 11,721 युनिट्स. किया सेल्टॉसचे 8,900 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 400 युनिट्सचा समावेश आहे. कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये मोठी मरगळ आली होती. परंतु सणासुदीचा मुहूर्त साधून लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केल्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य पाहायला मिळत आहे. Kia Motors ने म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरात दर तीन मिनिटाला सरासरी एका कारची विक्री झाली आहे.

संबंधित बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Mahindra ची खास स्कीम, कोणत्याही वाहनावर 11,500 रुपयांचा डिस्काऊंट

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

(New Kia Sonnet to be launched on november 11 with great features)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.