AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टोयोटाची शानदार Innova Crysta लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने इनोव्हाची थर्ड जनरेशन असलेली ‘Innova Crysta’ ही कार लाँच केली आहे.

टोयोटाची शानदार Innova Crysta लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
LG releases new 4K projector with 'triple image adjustment' feature
| Updated on: Nov 26, 2020 | 10:31 AM
Share

मुंबई : ऑटो सेक्टरमधील आघाडीची कंपनी असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटर (Toyota Kirloskar Motor) कंपनीने मंगळवारी एमपीव्ही इनोव्हाची थर्ड जनरेशन असलेली ‘Innova Crysta’ ही कार लाँच केली आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 16.26 लाख रुपये ते 24.33 लाख रुपये इतकी आहे. ही कार GX, VX आणि ZX या तीन ट्रिम्समध्ये सादर केली आहे. (New Toyota Innova Crysta facelift launched at RS 16 to 26 lakhs, Check features and everything about it)

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी म्हणाले की, “इनोव्हाने 15 वर्षांपूर्वी भारतात प्रिमियम एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवीन बेंचमार्क सेट केला आहे. ही कार अशा ग्राहकांसाठी डिझाईन केली आहे, ज्यांना त्यांची कार व्यासायिक कामांदरम्यान आणि मोठ्या प्रावासासाठीसुद्धा वापरायची असते. अतिशय सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी आम्ही ही सर्वोत्तम कार डिझाईन केली आहे.

नव्या इनोव्हाच्या पेट्रोल व्हेरियंट्सची एक्स-शोरूम किंमत

GX MT 7-सीटर Rs 16.26 लाख GX MT 8-सीटर Rs 16.31 लाख GX AT 7-सीटर Rs 17.62 लाख GX AT 8-सीटर Rs 17.67 लाख VX MT 7-सीटर Rs 19.70 लाख ZX AT 7-सीटर Rs 22.48 लाख

नव्या इनोव्हाच्या डिझेल व्हेरियंट्सची एक्स-शोरूम किंमत

G MT 8-सीटर Rs 16.69 लाख G+ MT 7-सीटर Rs 17.92 लाख G+ MT 8-सीटर Rs 17.97 लाख GX MT 7-सीटर Rs 18.07 लाख GX MT 8-सीटर Rs 18.12 लाख GX AT 7-सीटर Rs 19.38 लाख GX AT 8-सीटर Rs 19.43 लाख VX MT 7-सीटर Rs 21.59 लाख VX MT 8-सीटर Rs 21.64 लाख ZX MT 7-सीटर Rs 23.13 लाख ZX AT 7-सीटर Rs 24.33 लाख

इनोव्हाचं फर्स्ट जनरेशन मॉडेल 2005 साली भारतात लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत या कारच्या 8.8 लाख युनिट्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये इनोव्हा क्रिस्टाचाही समावेश आहे. इनोव्हाचं सेकेंड जनरेशन मॉडेल ‘इनोव्हा क्रिस्टा’ 2016 साली लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत या कारच्या 3 लाख युनिट्सची विक्री करण्यात आली आहे.

नवीन इनोव्हाच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. ही कार 2.4 लीटर डिझेल आणि 2.7 लीटर पेट्रोल इंजिन सोबत येते. 2.7 लीटर पेट्रोल इंजिन 166hp इतकी पॉवर जनरेट करतं, तर 2.4 लीटर डिझेल इंजिन 150hp इतकी पॉवर जनरेट करतं. सोबतच 5-स्पीड मॅनुअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

नवीन Toyota Fortuner साठी डिलरशीप लेवलवर बुकिंग सुरू, जाणून घ्या फिचर्स

Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

(New Toyota Innova Crysta facelift launched at RS 16 to 26 lakhs, Check features and everything about it)

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.