जनतेच्या आशीर्वादानेच मी अपघातातून वाचलो, त्यांचं महत्त्व मला माहिती आहे : नितीन गडकरी

नितीन गडकरी यांनी त्यांच्या आयुष्यात जनतेच्या आशीर्वादाला किती महत्त्व आहे हेच अधोरेखित केलं (Nitin Gadkari on Blessing of People).

जनतेच्या आशीर्वादानेच मी अपघातातून वाचलो, त्यांचं महत्त्व मला माहिती आहे : नितीन गडकरी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 01, 2020 | 8:38 PM

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लॉकडाऊननंतर प्रथमच नागपूरमधील पाटीदार समाज भवन येथे आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतला. लॉकडाऊन काळात 3 महिने जनतेला सतत जेवण पुरविण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नागपूरमध्ये राशन किटचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाच्यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी त्यांच्या आयुष्यात जनतेच्या आशीर्वादाला किती महत्त्व आहे हेच अधोरेखित केलं (Nitin Gadkari on Blessing of People). जनतेच्या आशीर्वादानेच मी अपघातातून वाचलो. त्या आशीर्वादाचं महत्त्व मला माहिती आहे, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात आमदार कृष्णा खोपडे, गिरीश व्यास हेही उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, “जनतेचे आशीर्वाद किती महत्वाचे असतात हे मला माहित आहे. त्याच जनतेच्या आशीर्वादाने मी अपघातातून वाचलो होतो. म्हणून हे आशीर्वाद महत्वाचे आहेत. गोर गरीब माणसाची सेवा हेच आपलं राजकारण आहे आणि तेच आपण केलं.”

“तीन महिन्यांनंतर आज मी पाहिल्यांदा कार्यक्रमात सहभागी झालो. या कठीण परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांनी गरजुंपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवण पोहचविलं हे मोठं काम आहे. सोबतच अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत नागरिकांना मदत केली. शहराच्या प्रत्येक भागात कार्यकर्त्यांनी काम केलं, मदत पोहचवली. ज्या कार्यकर्त्यांनी 3 महिने सतत हे काम केलं त्या कार्यकर्त्यांनाही मदत म्हणून राशन किट देत आहोत. कार्यकर्त्यांनी ही किट मागितली नाही. आमचे कार्यकर्ते प्रामाणिक आहेत. मात्र, त्यांची सुद्धा परिस्थिती चांगली नाही म्हणून त्यांनाही मदत आवश्यक आहे,” असं नितीन गडकरी म्हणाले.

“मदत कार्यात कार्यकर्त्यांना कोरोना संसर्गाची भीती, मात्र एकाही कार्यकर्त्याला बाधा नाही”

नितीन गडकरी म्हणाले, “रंजले गांजले, शोषित, पीडित लोकांपर्यंत 3 महिने ही मदत पोहचवली हे महत्त्वाचं आहे. कोणी कठीण काळात उपाशी राहू नये हा उद्देश ठेवला. त्या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे. यासाठी मी इथे आलो. मला चिंता होती एवढं मोठं काम करत असताना कार्यकर्ता बाधित होईल. मात्र, ईश्वराची कृपा आहे एकही कार्यकर्ता बाधित झाला नाही. मात्र सगळ्यांनी स्वतःची आणि जनतेचीही काळजी घ्या. आता आपल्याला कोरोना बरोबर जगण्याची कला हस्तगत करायला हवी.”

“लवकरच व्यवस्थित येईल आणि आपल्याला दिलासा मिळेल. आपण नागपूरात पीपीई कीट तयार केल्या. आधी त्या उपलब्ध नव्हत्या, आता आपण विदेशात पाठवत आहोत. सॅनिटायझर सुद्धा स्वस्तात निर्माण केलं. सगळ्या कार्यकर्त्यांसोबत कोविडं योद्धा म्हणून लढणारे पोलीस, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी या सगळ्यांना धन्यवाद देतो,” असंही गडकरींनी नमूद केलं.

हेही वाचा :

Tukaram Mundhe Clarification | स्मार्ट सिटीच्या कामात कोणतीही अनियमितता नाही, गडकरींच्या तक्रारीनंतर तुकाराम मुंढेंकडून खुलासा

उद्धव ठाकरेंना फेल करण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील

कल्याणमधील क्वारंटाईन सेंटरमधून गंभीर गुन्ह्यातील 2 कैदी फरार

Nitin Gadkari on Blessing of People

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें