AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरकरांना दोन-तीन दिवसांची मुदत, अन्यथा कडक लॉकडाऊन, तुकाराम मुंढेंचा इशारा

दोन-तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करुन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपूरकरांना दोन-तीन दिवसांची मुदत, अन्यथा कडक लॉकडाऊन, तुकाराम मुंढेंचा इशारा
| Updated on: Jul 23, 2020 | 8:53 PM
Share

नागपूर : नागपूरकरांनी बेजबाबदारीने वागणे थांबवले नाही (Tukaram Mundhe Warning To Nagpur People), तर नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. दोन-तीन दिवस निरीक्षण करणार, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुकाराम मुंढेंनी नागपूरकरांशी संवाद साधला (Tukaram Mundhe Warning To Nagpur People).

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला बेजबाबदापणे वागणारे नागरिकच कारणीभूत आहेत. जर शासनाच्या नियमांचे पालन होणार नसेल, तर नागपुरात लॉकडाऊनसोबतच कडक संचारबंदी लागू करावी लागेल, असे संकेत तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. शिवाय, दोन-तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करुन त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.

नागपुरात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यानुसारच विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच नागपुरात लॉकडाऊन की संचारबंदी? याविषयी महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी जनतेशी फेसबुकवरुन संवाद साधला.

हेही वाचा : समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!

बेजबाबदार नागरिकांमुळे आणि 100% नियमांचे पालन होत नसल्याने नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जर नागरिकांकडून हे थांबले नाही, तर दोन-तीन दिवस परिस्थितीचं निरीक्षण करून पुढील निर्णय घ्यावे लागतील. असे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. महानगर पालिकेचा मुख्य उद्देश हा कोरोना रुग्ण संख्येत घट करणे हाच आहे. मात्र, नागरिकांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने परिस्थिती कशी नियंत्रणात येईल, असा सवालही मुंढेंनी उपस्थित केला आहे (Tukaram Mundhe Warning To Nagpur People).

त्यामुळे बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंग, असो वा मास्क लावणे या नियमांचे पालन नागरिक करत नाही. त्यामुळे कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा सोबतच आपल्या जीवनशैलीत बदल करा जेणेकरुन कोरोनाचा फैलाव थांबवता येईल. शिवाय, गरज नसतांना घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, एका दुचाकीवर दोन तीन व्यक्ती बसणे. हे थांबणे अत्यंत गरजेचे असल्याचं मुंढेनी सांगितलं.

शासनेने अनलॉक करुन मुभा दिली, परंतु नागरिक नियमांचे पालन न करता रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळेच नागपुरातील कोरोनाची स्थिती बिघडत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. त्याचबरोबर येणारा ऑगस्ट महिना हा सण उत्सवाचा महिना आहे. त्यामुळे कोणताही सण सार्वजनिकरित्या साजरा होणारा नाही. प्रत्येकांनी व्यक्तीगत सण साजरे करा. शिवाय, केला तर सर्व नियमांचे पालन करुन करावे लागेल, असेही मुंढेंनी सांगितलं.

Tukaram Mundhe Warning To Nagpur People

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात कोरोना संसर्गदर 24 टक्के, चाचण्या वाढवल्याने दिल्लीत 6 टक्क्यांवर, फडणवीसांनी मांडली आकडेमोड

Anil Deshmukh | नागपुरात रेतीघाटांवर गृहमंत्र्यांची धाड, रेती माफियांचे कंबरडे मोडण्याचा अनिल देशमुखांचा निर्धार

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.