चंद्रपूरमधील रुग्णालयाचा कारभारही ‘राम भरोसे’, 2016 पासून अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे उघड

prajwal dhage

|

Updated on: Jan 12, 2021 | 3:00 PM

चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात मागील 4 वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. (fire extinguisher Chandrapur hospital)

चंद्रपूरमधील रुग्णालयाचा कारभारही 'राम भरोसे', 2016 पासून अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे उघड

Follow us on

चंद्रपूर : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालायला लागलेल्या आगीत तब्बल 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्यांनतर आता आणखी एका जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाचा ढिसाळ कारभास समोर आला आहे. चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात मागील 4 वर्षांपासून म्हणजेच 2016 पासून अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. रुग्णालय प्रशासनाने 2016 पासून अग्नीरोधक यंत्रणा लावण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला अजूनही मान्यता मिळालेली नाहीये. (no fire extinguisher system in Chandrapur civil hospital)

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 9 जानेवारी रोजी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला आग लागून तब्बल 10 बालकांचा मृत्यू झाला. अग्निरोधक यंत्रणा नसल्यामुळे रुग्णालयाला लागलेली आग वेळेत विझवता आली नसल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय. त्यानंतर आता चंद्रपूरच्या जिल्हा राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केले जात आहेत. चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात अग्निरोधक यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

अग्निरोधक यंत्रणा लावण्यासाठी आरोग्य प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागासोबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला होता. पण अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सध्या हाताने चालवल्या जाणाऱ्या 150 अग्निशामक यंत्रांवरच अग्निनिरोधी यंत्रणेचा भार असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

2016 पासून अग्निरोधक यंत्रणेचा प्रस्ताव रखडलेला

चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा लावण्यासाठी 44 लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, हा प्रस्ताव जिल्हा आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यादरम्यान पत्रव्यवहार स्तरावर टोलवीला जात आहे. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सातत्याने याबाबत पाठपुरावा करत आहे. सध्या केवळ हाताने चालवण्याच्या 150 अग्निशामक यंत्रांवरच अग्निनिरोधी यंत्रणेचा भार आहे.

संबंधित बातम्या :

Bhandara District hospital fire | भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना, सरकारी रुग्णालयात आग, 10 बाळं दगावली

पाचव्यांदा मातृत्वाची चाहूल, पाचही वेळा ओंजळ रितीच, भंडारा अग्नितांडवातील हिरकन्येची कहाणी

भंडारा रुग्णालय दुर्घटनेमधील पीडित कुटुंबांना मोदी सरकारची मोठी मदत

(no fire extinguisher system in Chandrapur civil hospital)

Non Stop LIVE Update

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI