उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

किमवर 12 एप्रिल रोजी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याची प्रकृती खालावली होती, असे वृत्त आहे (North Korean leader Kim Jong Un in fragile condition)

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन याची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी अमेरिकन वृत्तपत्रांनी दिली आहे. हृदयविकारासंबंधी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रकृतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. (North Korean leader Kim Jong Un in fragile condition)

किमवर 12 एप्रिल रोजी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया झाल्याचे वृत्त उत्तर कोरियातील बातम्या पुरवणाऱ्या दक्षिण कोरियामधील ‘डेली एनके’ या ऑनलाइन वृत्तपत्राने दिले आहे. ‘सीएनएन वाहिनी’ने ‘डेली एनके’च्या हवाल्याने वृत्त दिले आहे

उत्तर कोरियाचे पितामह किम द्वितीय सुंग यांची जयंती असल्याने 15 एप्रिल हा देशातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. मात्र, जयंती उत्सवाला किम जोंग उन गैरहजर होता. त्याच्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती न आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळेच किमच्या आरोग्याबद्दल उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. या सोहळ्याच्या चार दिवस आधी एका सरकारी बैठकीला तो शेवटचा दिसला होता.

अतिरिक्त प्रमाणात धूम्रपान, लठ्ठपणा आणि जास्त काम, यामुळे किमला हृदयरोग जडल्याची शक्यता ‘डेली एनके’च्या बातमीत वर्तवली आहे. सध्या त्याच्यावर ह्यंग्सन प्रांतामधील एका व्हिलामध्ये उपचार सुरु असल्याचा दावा केला जात आहे.

उत्तर कोरिया आपल्या नेत्याभोवतीच्या कोणत्याही माहितीवर कडकपणे नियंत्रण ठेवते. त्यामुळे अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना माहिती काढणे कठीण जात आहे. किमलाही देशात जवळजवळ एखाद्या दैवताप्रमाणे मानले जाते.

शासकीय माध्यमांमधील गैरहजेरीमुळे त्याच्या आरोग्याबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. वर्षानुवर्षे किम जोंग उन किंवा त्याच्या वडिलांच्या आरोग्याविषयी अनेक चुकीच्या अफवा पसरल्या जात आहेत. त्यातून काहीच निष्पन्न न झाल्याने तूर्तास अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(North Korean leader Kim Jong Un in fragile condition)

Published On - 9:21 am, Tue, 21 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI