AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुमित वाघमारेच्या हत्येचा कट रचणारा सापडला!

बीड : बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन तिच्या नवऱ्याला भर रस्त्यात संपल्याच्या बीडमधील घटनेने अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच, आरोपींना तातडीने पकडून त्यांनी फाशी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, हत्येला सहा दिवस उलटल्यानंतरही आरोपी सापडत नव्हते. अखेर तीन मारेकऱ्यांपैकी कृष्णा क्षीरसागर हा मारेकरी सापडला आहे. कृष्णाने सुमितच्या हत्येचा कट रचला होता. […]

सुमित वाघमारेच्या हत्येचा कट रचणारा सापडला!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

बीड : बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन तिच्या नवऱ्याला भर रस्त्यात संपल्याच्या बीडमधील घटनेने अवघ्या महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच, आरोपींना तातडीने पकडून त्यांनी फाशी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. मात्र, हत्येला सहा दिवस उलटल्यानंतरही आरोपी सापडत नव्हते. अखेर तीन मारेकऱ्यांपैकी कृष्णा क्षीरसागर हा मारेकरी सापडला आहे. कृष्णाने सुमितच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, अद्याप मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत हे दोघे फरार आहेत.

संपूर्ण घटना काय आहे?

जीवाचा आकांत करुन पतीला वाचवा म्हणून आर्त हाक देणाऱ्या या नवविवाहितेचे हे दृश्य पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील. ही दृश्य तुम्हाला विचलित करतील. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीच्या बाजूला बसलेल्या भाग्यश्री लांडगेचा आक्रोश ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणणारा आहे.

भाग्यश्री लांडगे आणि सुमित वाघमारे हे दोघेजण बीडच्या आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांची घट्ट मैत्री जमली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेऊन या दोघांनी लग्न केलं. मात्र, हे लग्न भाग्यश्रीच्या कुटुंबीयांना खटकलं. दोन महिन्यांपासून या प्रेमी जोडप्याचा शोध सुरु होता आणि  कालचा दिवस त्यांच्यासाठी काळ बनून आला. भाग्यश्रीच्या भावाने म्हणजे बालाजी लांडगेने मित्रांच्या मदतीने सुमित वाघमारेची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या केली.

काल सुमित आणि भाग्यश्रीची परीक्षा होती. पेपर संपवून ते संध्याकाळी पाच वाजता आदित्य महाविद्यालयाच्या बाहेर पडले. मात्र, तिथेच भाग्यश्रीचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र काळ बनून बसले होते. याची पुसटशी कल्पना सुद्धा भाग्यश्री आणि सुमितला नव्हती. महाविद्यालयाच्या बाहेरच अचानक हल्ला झाला आणि यात सुमित गंभीर जखमी झाला. सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना, पत्नी भाग्यश्री मोठ्या आकांतेने पतीला वाचावा म्हणून आक्रोश करत होती, गयावया करत होती. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या एकाचेही काळीज पाझरले नाही. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या संवेदना मेलेल्या होत्या. याउलट निर्लज्जपणे डोळ्यांनी पाहत ती घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. शेवटी एक रिक्षाचालक पुढे आला आणि सुमितला रिक्षात टाकून बीडच्या जिल्हा रुग्णालयात नेण्याचं धाडस केलं. मात्र रस्त्यातच सुमितची प्राणज्योत मालवली.

आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेरच हे हत्याकांड घडलं. जेव्हा सुमितवर हल्ला झाला, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही, एवढेच नव्हे, तर आदित्य महाविद्यालयाच्या वॉचमनने महाविद्यालयाचे गेट बंद केल्याचा आरोप सुमितच्या नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर बीड पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत मात्र हे सर्व मारेकरी तेथून पसार झाले होते. मारेकऱ्यांना अटक करा, यासाठी मध्यरात्रीपर्यंत बीडच्या शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक मार्गावर असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिस उपाधीक्षक सुधीर खेडकर यांनी सांगितले.

दुर्दैवी सुमितबद्दल माहिती

सुमीत वाघमारे बीड येथील आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगला शिकत होता. भाग्यश्रीही त्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. दीड महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्ट मॅरेज केलं होतं. सुमित अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा मुलगा होता. माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे एक रुम भाड्याने घेऊन दोघेही राहत होते. भाग्यश्रीच्या घरी श्रीमंती, तर सुमितच्या घरची स्थिती हालाखीची होती.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.