उत्तर प्रदेश पुन्हा बलात्काराने हादरलं, मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पुन्हा बलात्काराने हादरलं, मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

लखनौ : उत्तर प्रदेशमधल्या हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही, तोच उत्तर प्रदेशमधून आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. अशा घटना दररोज समोर येत आहेत. मेरठमधील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Eight year old girl raped in Meerut)

सदर मुलगी तिच्या घराजवळच्या परिसरात खेळत असताना अल्पवयीन आरोपीने मुलीला स्वतःच्या घरी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अल्पवयीन आरोपी मुलीला घराच्या छतावर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तो तिथून पळून गेला. दरम्यान आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून आरोपीच्या घराकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पीडितेची मेडिकल चाचणी केली जाणार आहे.

मेरठमध्ये एकाच आठवड्यात दुसरे प्रकरण

मेरठमध्ये एकाच आठवड्यात बलात्काराची दुसरी घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसचा चालक आणि वाहक या दोघांनी मिळून एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मेरठमध्ये यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 36 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मेरठमध्ये तब्बल 99 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.

गाजियाबादमध्ये बलात्काराचा प्रयत्न

उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद शहरातून बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. येथील तीन नराधमांनी एका सोसायटीत राहणाऱ्या 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या कुटुबियांनी आरोप केला आहे की, आरोपी त्यांना धमकावत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल चौधरी, कालू प्रधान, रोहित उर्फ रिंकू चौधरी अशी आरोपींची नावं आहेत.

संबंधित बातम्या

निर्भयाची वकील हाथरस पीडितेची केस लढणार, यूपी पोलिसांनी कुटुबियांना भेटण्यापासून रोखले

Hathras | घरात डांबून कुटुंबाला मारहाण, फोनही काढून घेतले, हाथरस पीडितेच्या भावाचा आरोप

(Eight year old girl raped in Meerut)

Published On - 1:31 pm, Sat, 3 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI