पत्ते खेळण्याच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या

''मगाशी काय नियम सांगता होता'' , असे म्हणत शाबुद्दीनला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाबुद्दीनला मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी यांनी पाठीमागून घट्ट पकडले. त्यानंतर शाबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्याजवळ चाकूने भोकसले.

पत्ते खेळण्याच्या वादातून एकाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या
crime

पिंपरी – मावळामधील इंदोरी येथे पत्ते खेळण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची धारदार शास्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शबुद्दीन अन्सारी (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत तरुण मूळचा उत्तरप्रदेशाचा रहिवाशी होता. याबाबत रियाज निसार अन्सारी (वय 23, रा. इंदोरी,उत्तरप्रदेश) याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जलाल शेख, मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी (तिघेही रा. इंदोरी, ता. मावळ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी रियाज, मयत शाबुद्दीन, अब्दुल हनान अन्सारी आणि आरोपी जलाल हे चौघे इंदोरी येथे भाड्याने खोलीत राहतात. शनिवारी रात्री चौघेही तीनपानी पत्ते खेळत होते. खेळा दरम्यान खेळाच्या नियमावरून शाबुद्दीन आणि जलाल शेख यांच्यात वाद झाला. पुढे माघार घेत खेळ संपवला त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. त्यानंतर जलाल शेख त्याच्या घरी गेला. तो त्याच्या दोन मेहुण्यांसोबत चाकू घेऊन परत आला.

”मगाशी काय नियम सांगता होता” , असे म्हणत शाबुद्दीनला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शाबुद्दीनला मोहम्मद इस्लाम अन्सारी, मोहम्मद इस्राईल अन्सारी यांनी पाठीमागून घट्ट पकडले. त्यानंतर शाबुद्दीनच्या छातीवर, पोटावर, डोळ्याजवळ चाकूने भोकसले. यात शाबुद्दीनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दुसरीकडे हॉटेल मालक व हॉटेल ग्रुपची बदनामी करण्याची धमकी देत 54 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी अनुराग भटनागर यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी अनुराग यांची आरोपी महिलेबरोबर कामानिमिता ओळख झाली. त्यानंतर महिलेने त्यांना वेळोवेळी ईमेल ,टेक्स मेसेजद्वारे व्हाट्सॲप मेसेजद्वारे फिर्यादीला संपर्क करत तब्बल 54 लाखांची खंडणी मागितली. मागणी पूर्ण न झाल्यास तुमची व तुमच्या हॉटेल ग्रुपची बदनामी करण्याची धमकी त्यांनी दिली.  पिंपरी पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करुन घेतली. मात्र संबंधित गुन्हा मुंबई येथे घडल्याने पुढील तपासासाठी हा गुन्हा खार पोलिस स्टेशन येथे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा

ते मानानं मोठे, पण त्यांनी काहीही सूचवावं हे चालणार नाही; अभिनेते गोखलेंच्या वक्तव्यावर पेडणेकरांचे शेलके ताशेरे

अमरावतीत दंगली भडकवण्यासाठी मुंबईतून पैसे आले, एका आमदाराने पैसे वाटले; नवाब मलिक यांचा मोठा दावा

दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI