AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लासलगावात कांदा लोडिंग करताना ओव्हरहेड वायरचा झटका, तरुणाचा मृत्यू

लासलगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी (2 जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारारास कोलकातासाठी कांदा लोडिंग सुरु असताना एका तरुणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका बसला (overhead wire shock).

लासलगावात कांदा लोडिंग करताना ओव्हरहेड वायरचा झटका, तरुणाचा मृत्यू
| Updated on: Jul 03, 2020 | 10:07 AM
Share

नाशिक : लासलगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी (2 जुलै) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारारास कोलकातासाठी कांदा लोडिंग सुरु असताना एका तरुणाला ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका बसला (overhead wire shock). हा तरुण कांदा लोडिंगसाठी बोगीवर चढत होता. मात्र, यावेळी त्याला ओव्हरहेड वायरला तीव्र झटका बसला. या झटक्यात तरुण 70 टक्के भाजला. या तरुणाचं नाव समाधान नवनाथ शिरसागर आहे. तो नांदूर मध्यमेश्वर येथे वास्तव्यास होता. दरम्यान,  निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला (overhead wire shock).

लासलगाव रेल्वे स्थानकावर सध्या कांदा लोडिंगचे काम सुरु आहे. लासलगाव येथून कोलकातासाठी 40 बोगीची रॅक असलेल्या मालगाडीत 1600 टन कांदा भरण्याचे काम सुरु होते. दरम्यान लोडिंग सुरु असताना निफाड येथील कांद्यांनी भरलेला ट्रक कांदा लोडिंगसाठी आला.

गाडी ड्रायव्हर सागर पवार आपला ट्रक बोगी जवळ लावत होता. यावेळी त्याच्यासोबत असलेला समाधान शिरसागर हा तरुण कांदा लोडिंगसाठी पोल क्रमांक 235/10-12 जवळ उभ्या असलेल्या मालगाडीवर चढू लागला. बोगीवर चढल्यावर त्याला ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका बसला.

समाधानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रात्री दहा वाजता निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेत तो जवळपास 70 टक्के भाजल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला होता. अखेर रात्रभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : महावितरणला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 10 हजार कोटी रुपये द्या, नितीन राऊत यांची केंद्राकडे मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.