एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर, कोणती लस जास्त प्रभावी?

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर, कोणती लस जास्त प्रभावी?

या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या डेटामध्ये विविध गोष्टींबाबत माहिती दिली आहे. (Oxford Astrazeneca And Pfizer Corona vaccine Report) 

Namrata Patil

|

Dec 09, 2020 | 2:39 PM

नवी दिल्ली : एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड आणि फायझर एनबायोटेक या दोन्ही कंपन्यांनी कोरोना विषाणूवरील लस तयार केली आहे. या लसीला भारतात आपातकालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मंगळवारी (8 डिसेंबर) या दोन्ही कंपन्यांच्या कोरोना लसीच्या अंतिम टप्प्यातील वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर आला. या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या डेटामध्ये विविध गोष्टींबाबत माहिती दिली आहे. (Oxford Astrazeneca And Pfizer Corona vaccine Report)

ब्रिटनच्या फायझर कंपनीने नुकतंच कोरोना लसीच्या चाचणीचा पहिला डोस दिला. त्यानंतर 21 दिवसांनी याचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड आणि फायझर एनबायोटेक या दोन्ही कंपन्यांच्या कोरोना लसीचा अहवाल The Lancet या वेबसाईटने प्रदर्शित केला. The Lancet या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कंपन्यांच्या लस या 70 टक्के प्रभावी ठरत आहे. तसेच या दोन्ही लस सुरक्षित आहेत. या लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या लोकांवर ही लस 62 टक्के प्रभावी ठरत आहे. तर ज्यांनी पहिला डोस अर्धा आणि त्यानंतरचा पूर्ण घेतला आहे, त्यांच्यावर ही लस 90 टक्के परिणामकारक दिसत आहे.

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डन जारी केलेल्या माहितीनुसार, ब्रिटेन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही देशातील 23 हजार 745 स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदवला आहे. यात 82 टक्के लोक हे 18 ते 55 वय असलेले आहेत. तर 56 वर्ष किंवा त्यावरील वयाच्या अधिक लोकांचा समावेश आहे. मात्र या लोकांवरील चाचणीचा अहवाल अद्याप प्रदर्शित करण्यात आलेला नाही.

एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या या कोरोना लसीचा डेटा भारतासाठीही महत्त्वपूर्ण आहे. कारण पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने एस्ट्राजेनेका या कंपनीसोबत 100 कोटी डोसचा करार केला आहे.

फायझरच्या कोरोना लसीवर अभ्यास

फायझर एनबायोटेकच्या लसीच्या चाचणीसाठी 16 वर्ष किंवा त्यावरील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान या लसीवर सध्या अभ्यास केला जात आहे. अमेरिका, अर्जंटीना, ब्राझील, जर्मनी, दक्षिण आफ्रिका या देशांतही याबाबतचा अभ्यास करण्यात येत आहे. फायझर एनबायोटेक या कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी 43 हजार 661 स्वंयसेवकांवर करण्यात आली होती. यात 41 हजार 135 स्वंयसेवकांचा दुसरा डोस देण्यात आला. या आधारावर 90 टक्के प्रभावी असण्याचा दावा केला आहे.  (Oxford Astrazeneca And Pfizer Corona vaccine Report)

संबंधित बातम्या : 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावू नका- सर्वोच्च न्यायालय

67 देशांचे राजदूत भारत दौऱ्यावर, भारत बायोटेकच्या कोरोना लसीचा आढावा घेणार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें