स्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला

उत्तर देत आम्हीही भारताच्या पाच सैनिकांचा खात्मा केला, असा दावा पाकिस्तानने केला होता, जो खोटा (Pakistan Army soldiers killed) ठरलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलंय.

स्वतःचे तीन सैनिक गमावले, खोटं बोलून पाकिस्तान स्वतःच्याच जाळ्यात अडकला

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचं पुनर्गठन केल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड झालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागूनही कुणी प्रतिसाद न दिल्याने आणखीच संतापलेल्या पाकिस्तानने आता खोटे दावे करणं सुरु केलंय. दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये जाणं सोपं व्हावं यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार केला जातोय. यात भारताने प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानच्या तीन सैनिकांना कंठस्नान (Pakistan Army soldiers killed) घातलं. पण याला उत्तर देत आम्हीही भारताच्या पाच सैनिकांचा खात्मा केला, असा दावा पाकिस्तानने केला होता, जो खोटा (Pakistan Army soldiers killed) ठरलाय. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचं भारतीय सैन्याने स्पष्ट केलंय.

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सैन्याने पुँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये सकाळी 7 वाजता गोळीबार सुरु केला. भारतीय जवानांनीही याला सडेतोड उत्तर दिलं आणि पाकिस्तानला यात मोठं नुकसान सहन करावं लागलं. सकाळी 7 ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत झालेल्या गोळीबारात पाकिस्तानचे तीन जवान मारले गेले. पाकिस्तानने स्वतः आपले सैनिक मारले गेल्याचं कबूल केलंय.

जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केल्यामुळे पाकिस्तानचा संताप झालाय. या निर्णयामुळे आता काश्मीरमध्ये दहशतवाद पोसता येणार नाही, अशी पाकिस्तानला भीती आहे. यासाठीच एकीकडे पाकिस्तानी सैनिक गोळीबार करुन भारतीय सैनिकांचं लक्ष विचलित करतात आणि दहशतवाद्यांना घुसण्यासाठी मदत करतात. पण पाकिस्तानचा एकही प्रयत्न भारतीय जवानांनी यशस्वी होऊ दिलेला नाही.

भारतीय सैन्याचे नॉर्थर्न कमांडचे प्रमुख ले. जनरल रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने दहशतवाद्यांची मदत करण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय. पण कायम सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI