AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जबाजारी पाकिस्तानचा पाय खोलात, FATF च्या काळ्या यादीत समावेश

मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देण्याशी संबंधित 40 मानदंडांपैकी पाकिस्तान 32 मानदंड पूर्ण करु शकलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरोधात एफएटीएफने कठोर पावलं उचलली आहेत.

कर्जबाजारी पाकिस्तानचा पाय खोलात, FATF च्या काळ्या यादीत समावेश
| Updated on: Aug 23, 2019 | 12:41 PM
Share

मुंबई : कर्जबाजारी पाकिस्तानचा (Pakistan) पाय आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी खोलात गेला आहे. दहशतवाद्यांचं पालनपोषण करणाऱ्या पाकिस्तानला फायनॅन्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (Financial Action Task Force – FATF) ने काळ्या यादीत (Black List) टाकलं आहे.

‘एफएटीएफ’ ही दहशतवादाला आर्थिक बळ देणाऱ्या देशांवर निगराणी ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देण्याशी संबंधित 40 मानदंडांपैकी पाकिस्तान 32 मानदंड पूर्ण करु शकलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानविरोधात एफएटीएफने कठोर पावलं उचलली आहेत.

पाकिस्तानला गेल्या वर्षी एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. त्यामुळेच सध्याचं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. दहशतवाद संपवण्यासाठी पाकिस्तानला बहुसूत्री कार्यक्रमही देण्यात आला होता, पण यामध्ये त्यांना अपयश आलं. काळ्या यादीत टाकल्यामुळे पाकिस्तानला कर्ज घेणं आणखी कठीण होणार आहे.

फ्लोरिडातील ओरलँडोमध्ये आयोजित बैठकीत ‘एफएटीएफ’ने चिंता व्यक्त केली. पाकिस्तान टेरर फंडिंगबाबत आपला अॅक्शन प्लान पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहेच, मात्र मेपर्यंत वाढवून दिलेली मुदतही उलटून गेली आहे. अॅक्शन प्लानमध्ये जमात-उद-दावा, फलाही-इन्सानियत, लष्तर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि अफगान तालिबान यासारख्या दहशतवादी संघटनांच्या फंडिंगवर लगाम घालण्यास सांगितलं होतं.

काय आहे एफएटीएफ?

मनी लाँड्रिंगचा सामना करण्यासाठी जी-7 देशांनी 1989 मध्ये एफएटीएफ या आंतरशासकीय संस्थेची स्थापना केली होती. एफएटीएफचं मुख्यालय फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. 2001 मध्ये या संस्थेचं कार्यक्षेत्र दहशतवादाला आर्थिक पुरवठ्यावर नजर ठेवण्यासाठी वाढवण्यात आलं. स्थापना करताना एफएटीएफचे 16 सदस्य देश होते, तर 2016 मध्ये ही संख्या 37 झाली आहे. भारतासह जगातील जवळपास सर्व मोठ्या देशांचा यामध्ये समावेश आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.