पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले, व्यापारही थांबवला

7 ऑगस्टपासून पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त बसणार नाहीत, तर भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापारही बंद केला जाईल, असं पाकिस्ताने जाहीर केलंय. भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही तातडीने परत बोलावलं जाणार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलंय.

पाकिस्तानने भारतासोबतचे राजनैतिक संबंध तोडले, व्यापारही थांबवला

इस्लामाबाद : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्याने पाकिस्तानचा (Pakistan National Security Committee) चांगलाच जळफळाट झालाय. 7 ऑगस्टपासून पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त बसणार नाहीत, तर भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापारही बंद केला जाईल, असं पाकिस्ताने (Pakistan National Security Committee) जाहीर केलंय. भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुक्तांनाही तातडीने परत बोलावलं जाणार असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितलंय.

राजनैतिक संबंध तोडण्यासोबतच पाकिस्तानकडून व्यापारावरही बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलाय.

पाकिस्तानकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती (यूएनएससी) मध्ये नेला जाणार आहे. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. पण पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष पीटीआय 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन असलेला दिवस काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे.

मंगळवारी इम्रान खानने पोकळ धमकीही दिली होती. दोन्ही देश असा युद्धाकडे जात आहेत, जे कुणीही जिंकू शकणार नाही, असं इम्रान खानने म्हटलं होतं. तर आमचं सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याचं पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवाने म्हटलं होतं.

दरम्यान, भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत ठणकावण्यात आलं होतं. पाकिस्तानकडून एलओसीवर ज्या हालचाली सुरु आहेत, त्याचे परिणाम वाईट होतील आणि ते पाकिस्तानला परवडणारं नसेल, असं भारतीय सैन्याने म्हटलं होतं.

लोकसभेत मंगळवारी जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक मंजूर करण्यात आलंय. ज्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती होणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI