पाकिस्तानच्या रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक संकटं वाढली!

मुंबई : आधीच अर्थव्यवस्था पार डळमळीत झालेल्या आणि आर्थिक संकटांशी झुंजणाऱ्या पाकिस्तानसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. पाकिस्तानी रुपयाच्या किंमतीत डॉलरच्या तुलनेत ऐतिहासक घसरण झाली आहे. भारतीय रुपयाच्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीवर पाकिस्तानच्या रुपयाची किंमत पोहोचली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसमोरील आर्थिक संकटं आणखी वाढणार आहेत. पर्यायाने, पाकच्या विकासाच्या गतीत आणखी मोठे अडथळे निर्माण होतील. एका […]

पाकिस्तानच्या रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक संकटं वाढली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : आधीच अर्थव्यवस्था पार डळमळीत झालेल्या आणि आर्थिक संकटांशी झुंजणाऱ्या पाकिस्तानसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. पाकिस्तानी रुपयाच्या किंमतीत डॉलरच्या तुलनेत ऐतिहासक घसरण झाली आहे. भारतीय रुपयाच्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीवर पाकिस्तानच्या रुपयाची किंमत पोहोचली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसमोरील आर्थिक संकटं आणखी वाढणार आहेत. पर्यायाने, पाकच्या विकासाच्या गतीत आणखी मोठे अडथळे निर्माण होतील.

एका डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचा दर 144 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भारतीय रुपयाची किंमत प्रती डॉलरसाठी 69.68 रुपये आहे.

पाकिस्तानात तीन महिन्यांपूर्वी सत्तांतर घडले. त्यानंतर माजी क्रिकेटर आणि पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान हे पंतप्रधानपदी विराजमान झाले. इम्रान खान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर विराजमान झाल्याला सुद्धा 100 दिवस उलटून गेले आहेत. ते पंतप्रधानपदावर आल्यानंतरच त्यांनी पाकिस्तानच्या आर्थिक धोरणांमध्ये बदल करण्याचे घोषित केले होते. मात्र, तरीही पाकिस्तानमध्ये आर्थिक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी, गुंतवणूक वाढावी, पाकिस्तानने विकासाकडे वाटचाल करावी म्हणून इम्रान खान एकीकडे प्रयत्न करत आहेत, त्याचवेळी पाकिस्तानी रुपयाने दीड शतकाकडे वाटचाल करत आहे. गुरुवारी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया 134 वर होता. काल (शुक्रवारी) मात्र आणखी 10 रुपयांनी घसरत 144 वर आला. आज म्हणजे शनिवारी पुन्हा घसरत 142 पर्यंत पाकिस्तानी रुपया पोहोचला आहे.

दरम्यान, पाकिस्तानसमोरील आर्थिक संकट टाळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदतनिधी मागितला आहे. शिवाय, पाकिस्तानातील इंधनाचे दर आणि टॅक्समध्ये वाढीचाही प्रस्ताव इम्रान खान यांनी मांडला आहे. त्यामुळे येत्या काळात इम्रान खान पाकिस्तानची अर्थव्यवस्था कशी सांभाळतात, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.