AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची शायरा राय ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन, दोनदा जिंकला किताब, संधी मिळाल्यास भारतात राहण्याची इच्छा

शायराने पाकिस्तानातील लाहोरची मुळची रहिवासी असून तिने लाहोरमधून आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. तिची ज्यावेळी शाळा पुर्ण झाली त्यावेळी तिच्या घरच्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला.

पाकिस्तानची शायरा राय 'मिस ट्रान्स ब्युटी क्वीन, दोनदा जिंकला किताब, संधी मिळाल्यास भारतात राहण्याची इच्छा
शायरा रायला 'मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022'
| Updated on: Feb 07, 2022 | 7:38 AM
Share

मुंबई – नुकत्याचं पाकिस्थानमध्ये (pakistan) झालेल्या एका सौदर्यं स्पर्धेची मोठी चर्चा असल्याचं ऐकण्यास मिळत आहे. तिथं झालेल्या स्पर्धेत तिथल्या सर्व मॉडेल्सना त्या कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळाली. व्हर्च्युअल सौंदर्य स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला त्या सगळ्या स्पर्धेकांना आंतराराष्ट्रीय होणा-या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याची सुध्दा पाकिस्तामध्ये मोठी चर्चा आहे. व्हर्च्युअल सौंदर्य स्पर्धेत (virtual beauty contest) सगळ्यांच्या नजरा फक्त ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ या किताबावर खिळल्या असल्याचं चित्र होतं. कोण तो मुकुट जिंकणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. त्यामुळे निर्णय लागेपर्यंत अनेकजण चिंतेत होते. अखेरीस ज्यावेळी निकाल जाहीर करण्याची वेळ आली, त्यावेळी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पाकिस्तानातील रहिवासी असलेल्या शायरा रायला ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ (Syraa Roy, Miss Trans Beauty Queen 2022) ही पदवी देण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Shyraa Roy (@shyraaroy)

आजतकच्या रिपोर्टनुसार, शायराने ज्यावेळी ‘मिस ट्रान्स ब्युटी क्वीन 2022’ हा किताब जिंकला त्यावेळी तिने आपल्या करिअर झालेल्या स्ट्रगल विषयी मिडीयासमोर आपलं म्हणणं मांडलं. तसेच ती हा किताब दुस-यांदा जिंकत असून यासाठी स्पेशल मेहनत घेत असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे शायराच्या अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांना माहित झाल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shyraa Roy (@shyraaroy)

दुबईत घेतलं शिक्षण 

शायराने पाकिस्तानातील लाहोरची मुळची रहिवासी असून तिने लाहोरमधून आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. तिची ज्यावेळी शाळा पुर्ण झाली त्यावेळी तिच्या घरच्यांनी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. पुढच्या शिक्षणासाठी तिने दुबईतल्या एमिटी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं तिने इंटेरिअर डिझाईनचा कोर्ससाठी प्रवेश घेतला. परंतु तिथं तिचं मन रमत नसल्याने तिने तिथून टुरिज्ममध्ये पुन्हा प्रवेश घेतला. तिचं पदवीपर्यंचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने जर्नालिझम पुर्ण केल्याचं मीडियाला सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shyraa Roy (@shyraaroy)

भारतातल्या या सलिब्रिटींची ओळख 

शायराला सुरूवातीपासून गाणे गाण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे तिचं कौशल्य पाहून तिला दुबईच्या एका रेडिओ जॉकीची नोकरी सुध्दा मिळाली होती. त्यावेळी तिने उर्वशी रौतेला, विद्या बालन, करण वाही, बोहेमिया, बोमन ईरानी इत्यादी कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ज्यावेळी ती अनेक सेलिब्रिटीच्या मुलाखती घ्यायची त्यावेळी ती त्यावर खूप विचार करायची.

View this post on Instagram

A post shared by Shyraa Roy (@shyraaroy)

भारतात यायची इच्छा 

ती सध्या दुबईत राहत असून तिथं मला भारत खूप आवडतो, कारण तिथं फिरायला जायला अधिक ठिकाणं आहेत. तसेच मला भारतातलं कल्चर अधिक आवडतं. मी दुबईत राहत असून देखील मला मी भारतीय अन्न अधिक खात असल्याचे तिने स्पष्ट केलंय. तसेच मला भारतात राहण्याची संधी मिळाली, तर मी नक्की भारतात राहायला जाईन असंही तिने म्हणटलं आहे.

आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला? पूर्ण व्हिडीओ पहा काय घडलं

Rip Lata Mangeshkar : दिदींच्या जाण्याने देशभर शोक, भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप

Rip Lata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत… लाडक्या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते, सेलिब्रिटींची अंत्यसंस्काराला हजेरी

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.