मित्राची हत्या, हत्येनंतर कल्याण क्राईम ब्रांच ऑफिससमोर पान विक्री, पोलिसांनी शिताफीने छडा लावला

पैसे चोरी केल्याच्या संशयावरुन पान टपरी चालकाने आपल्या साथीदाराची हत्या केली (Pan shop owner kill friend Kalyan).

मित्राची हत्या, हत्येनंतर कल्याण क्राईम ब्रांच ऑफिससमोर पान विक्री, पोलिसांनी शिताफीने छडा लावला
Follow us
| Updated on: Aug 27, 2020 | 2:48 PM

कल्याण : पैसे चोरी केल्याच्या संशयावरुन पान टपरी चालकाने आपल्या साथीदाराची हत्या केली (Pan shop owner kill friend Kalyan). ही घटना कल्याण येथे घडली. मित्राने मित्राची हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. कल्याण क्राईम ब्रांचने आरोपीला अटक केले आहे. सुनील पटेल असं आरोपीचे नाव आहे. तर सूरज पाल असं मृताचे नाव आहे (Pan shop owner kill friend Kalyan). आरोपी हा पान टपरी चालक असून तो हत्येनंतर क्राईम ब्रांच कार्यालयासमोर पान टपरी चालवत होता.

आरोपी आणि मयत हे दोघे उत्तर प्रदेश येथील बांदा जिल्हा येथे राहणारे आहेत. 21 ऑगस्टच्या रात्री पैसे चोरीच्या संशयावरून सुनीलने सूरजला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. त्याचा मृतदेह कल्याण शीळ रोडवरील क्लासिक हॉटेलच्या बाजूला असलेल्या तलावात फेकून दिला.

सुनीलने सूरजची हत्या केल्यानंतर परिसरातच या घटनेची माहिती पसरली. या हत्येची कुणकुण कल्याण क्राईम ब्रांचला लागली. त्यानंतर त्यांनी या हत्येचा शोध घेण्यास सुरुवात केली. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या पथकाने या प्रकरणी सखोल तपास करून मयत सूरज चा मृतदेह शोधून काढला आणि हत्येचा आरोपी सुनील पटेलला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात नसताना क्राईम ब्रांचने या हत्येचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

हत्येनंतर चार दिवसांपासून सूरज बेपत्ता आहे. मात्र कुणी त्याचा शोध घेत नव्हते. तसेच सुनीलने सुरजचा खून केला आहे ही चर्चा विभागात पसरली होती. कल्याण क्राईम ब्रांचने जेव्हा सुनीलला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा हा प्रकार समोर आला. सुनील हा कल्याण क्राईम ब्रांच कार्यालयसमोर अनेक वर्षांपासून पान टपरी चालवतो.

संबंधित बातम्या :

रडण्याला कंटाळून मातेने नऊ महिन्यांच्या मुलाला संपवलं, चोराने मंगळसूत्र खेचून बाळाची हत्या केल्याचा बनाव

झाडांच्या नावाखाली गांजाची तस्करी, जळगावात 38 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.