शिक्षकांच्या बदल्यावरुन पंकजा मुंडे आक्रमक, ठाकरे सरकारकडे रोखठोक मागणी

शिक्षकांच्या बदल्यांमधील वशिलेबाजी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने, विशेषकरुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबले होते

शिक्षकांच्या बदल्यावरुन पंकजा मुंडे आक्रमक, ठाकरे सरकारकडे रोखठोक मागणी

मुंबई : ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे भ्रष्टाचार आणि शोषण होईल, असा दावा भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला आहे. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करावा, अशी मागणी पंकजा यांनी केली. पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदी असताना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत घेतलेला निर्णय ठाकरे सरकारने बदलला होता. (Pankaja Munde demands Online transfer method for ZP School Teachers)

“कोरोना’च्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले. ज्याचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑफलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकट आणेल. राज्य सरकारने यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. पारदर्शकता आणि मेरिट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

शिक्षकांच्या बदल्यांमधील वशिलेबाजी रोखण्यासाठी फडणवीस सरकारने, विशेषकरुन तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऑनलाईन बदल्यांचे धोरण अवलंबले होते. मात्र महाविकास आघाडी सत्तेत येताच हे धोरण बदलून बदल्यांचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आले.

शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या ग्रामविकास विभागाकडून घेण्यात येत होत्या. परंतु ऑनलाईन बदल्यांची पद्धत बंद करत जिल्हा परिषदांकडे बदलीचे अधिकार देण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात झाला होता. तेव्हा या बदल्या जिल्हा परिषदांऐवजी ग्रामविकास खात्यामार्फत व्हाव्यात अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली होती.

हेही वाचा : Pankaja Munde | भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

राज्यभरातील तब्बल 45 शिक्षक संघटनांनी या संदर्भातील मागण्या अभ्यासगटाला दिल्या होत्या. अंतर्गत बदली झाल्यानंतर एकाच शाळेवर तीन वर्षानंतर पुन्हा बदलीसाठी विनंती अर्ज करता येण्याची मुभा द्यावी, अशा अनेक सूचना ग्रामविकास विभागाने या संदर्भात नेमलेल्या अभ्यास गटापुढे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडल्या होत्या. (Pankaja Munde demands Online transfer method for ZP School Teachers)

Published On - 11:30 am, Thu, 16 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI