Pankaja Munde | भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर पहिली प्रतिक्रिया (Pankaja Munde Comment after BJP executive committee announce) दिली.

Pankaja Munde | भाजपची कार्यकारणी जाहीर, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर (Pankaja Munde Comment after BJP executive committee announce) झाली. माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीवर पहिली प्रतिक्रिया दिली.

“भाजपच्या नवीन टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार,” असे ट्विट पंकजा मुंडेंनी केले आहे. मात्र केंद्रात नक्की कोणती जबाबदारी मिळणार याबद्दल पंकजा मुडेंनी बोलणं टाळल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपची कार्यकारिणी 

महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक

उपाध्यक्ष –माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर असे 12 उपाध्यक्ष असतील

सेक्रेटरी –

माजी आमदार प्रमोद जठार, , संजय पुराम, अॅड धर्मपाल मेश्राम, खासदार रक्षा खडसे, संदीप लेले, स्नेहलता कोल्हे, दयानंद चोरगे, इंद्रिस मुलतानी, अमित गोरखे, नागनाथ निरोवदे, राजेंद्र बकाने, अर्चना तेहटकर

विधानसभेत मुख्य प्रतोद आशिष शेलार आणि प्रतोद माधुरी पिसाळ

हेही वाचा – BJP Executive Committee | पंकजा मुंडेंना राज्यातील राजकारणातून वगळलं जातयं का?

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? 

“पंकजा मुंडे यांना केंद्रामध्ये चांगली जबाबदारी मिळणार आहे. केंद्राने असं सूचवलं की, केंद्रामध्ये त्यांना जबाबदारी देत आहोत. त्यामुळे आमच्या कोअर कमिटीच्या त्या 100 टक्के सदस्या असतील. त्या आमच्याबरोबरच राहतील. पण महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, कारण त्यांनी केंद्रात वेळ द्यावा, अशी केंद्राची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्राची जबाबदारी महाराष्ट्राच्या कोअर कमिटीच्या सदस्यांना शंभर टक्के असेल. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता सर्व कार्यकारणीत आहेत. ती यादी आता वाचणं शक्य नाही”.

प्रीतम मुंडे, रक्षा खडसे या दोन टर्म खासदार आहेत. कर्तृत्वान आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे त्यांना काम मिळाले. पंकजा ताईंची बहीण किंवा एकनाथ खडसे यांची सून म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आलेली नाही. नाराजी दूर करण्याचा प्रश्नच नाही. नाराजी तात्पुरती असते, असं चंद्रकांत पाटलांनी नमूद (Pankaja Munde Comment after BJP executive committee announce) केलं.

संबंधित बातम्या : 

भाजपची कार्यकारिणी जाहीर, प्रीतम मुंडे राज्यात, पंकजा मुंडे केंद्रात

राष्ट्रवादीतून आलेल्या चित्रा वाघ यांना भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी

पंकजांनी महाराष्ट्रात वेळ देणं बरोबर नाही, ही तर केंद्राची इच्छा : चंद्रकांत पाटील

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *