दानवे प्रीतमताईंचा फॉर्म भरायला आले, त्या जिंकल्या, माझ्यावेळी आले नाहीत, मी हरले : पंकजा

”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दानवे प्रीतमताईंचा फॉर्म भरायला आले, त्या जिंकल्या, माझ्यावेळी आले नाहीत, मी हरले : पंकजा
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 5:43 PM

औरंगाबाद : “रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा फॉर्म भरायला आले आणि प्रीतमताईंचा विजय झाला, पण आमदारकीवेळी माझा फॉर्म भरायला आले नाहीत, मी पराभूत झाले” असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची खुशामत केली. (Pankaja Munde says I lost when Raosaheb Danve did not visit to file my nomination form)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी दिली.

”भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि त्याचा मला अहंकार नाही, तर प्रेम आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“एका व्यक्तीचं तिकीट कापून मी शिरीष बोराळकर यांच्या कार्यक्रमाला आले, त्यामुळे जो काही मेसेज द्यायचा तो मी दिला आहे. सर्व वर्गांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. माझ्यावर पक्षाचे आणि बापाचे संस्कार आहे. त्यामुळे मी पूर्ण काम करेन” अशी ग्वाही पंकजा मुंडेंनी दिली.

“तिकीट देण्यावरुन मतं व्यक्त केली, आणि मत आम्ही कानात बोलत नाही, जाहीर बोलतो, प्रवीण घुगे यांनी पक्षाच्या आदेशाने अर्ज भरला होता, एखाद्या वेळेस अर्ज बाद झाला तर उमेदवार असावा म्हणून भरला आहे” असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात होतं.

बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते

“मुंडे नावाला वलय आहे, काही लोक चर्चा करतात पण मी त्याला घाबरत नाही, एखादा प्रश्न हातात घेतला तर तो तडीस नेण्याचा मी प्रयत्न करते. भाजप सरकारचे चांगले निर्णय रद्द करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि त्यांना कोर्टाने चांगला चोप दिला आहे.” असेही पंकजा म्हणाल्या. (Pankaja Munde says I lost when Raosaheb Danve did not visit to file my nomination form)

“मी नाराज नाही, सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. सगळीकडे निवडणूक होत आहे. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे” असं पंकजा मुंडे यांनी याआधी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं होतं.

 पाहा व्हिडीओ : संबंधित बातम्या :

सर्वच जवळचे कार्यकर्ते, बळ लावण्यासाठी औरंगाबादेत, बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजांची प्रतिक्रिया

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

(Pankaja Munde says I lost when Raosaheb Danve did not visit to file my nomination form)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.