AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वच जवळचे कार्यकर्ते, बळ लावण्यासाठी औरंगाबादेत, बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजांची प्रतिक्रिया

पंकजा समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

सर्वच जवळचे कार्यकर्ते, बळ लावण्यासाठी औरंगाबादेत, बोराळकरांचा अर्ज भरताना पंकजांची प्रतिक्रिया
| Updated on: Nov 12, 2020 | 12:27 PM
Share

औरंगाबाद : मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळेच माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. विधानपरिषदेवरील औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून शिरीष बोराळकर यांनी अर्ज भरला. यावेळी पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. (Aurangabad Graduate Constituency BJP candidate Shirish Boralkar files nomination in presence of Pankaja Munde)

मराठवाडा औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या समर्थकाने बंडाचे निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडे बोलत होत्या. “मी नाराज नाही, सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. सगळे माझ्या जवळचे कार्यकर्ते आहेत. सगळीकडे निवडणूक होत आहे. मी सगळं बळ लावण्यासाठी इथे आले आहे” असं पंकजांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला सांगितलं.

पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून भाजपसोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना पक्षाने अधिकृतरित्या तिकीट दिले आहे. तर बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकवत अर्ज भरला. पोकळे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांनीही बंडखोरी करत अर्ज भरला. मराठवाड्यातील तीन मोठ्या उमेदवारांनी बंडखोरी केल्याने भाजपला जबर हादरा बसल्याचे बोलले जाते

“त्या बैठकीला उपस्थितीची आवश्यकता नव्हती”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जी बैठक घेतली त्यात माझ्या उपस्थितीची आवश्यकता नव्हती, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. चंद्रकांत पाटील बीड जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्याकडे पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवल्यामुळे त्या नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आपण मराठवाडयातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही, असे याआधीच सांगितल्याचे स्पष्ट केले होते. (Aurangabad Graduate Constituency BJP candidate Shirish Boralkar files nomination in presence of Pankaja Munde)

दरम्यान, ऊसतोड कामगार फक्त भाजपचे नाहीत, राष्ट्रीवादीचे आणि काँग्रेसचेही आहेत. ऊसतोड कामगारांची सेवा भाजप आमदार सुरेश धस करत असतील तर त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या मतदारसंघात 40 50 हजार ऊसतोड कामगार आहेत, त्यांची सेवा त्यांनी केली पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणल्या. ऊसतोड मजुरांच्या प्रश्नी पंकजा आणि धस आमनेसामने आले होते.

संबंधित बातम्या :

मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहणार नाही, हे आधीच सांगितलं होतं; पंकजा मुंडेंचं ट्विट!

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

(Aurangabad Graduate Constituency BJP candidate Shirish Boralkar files nomination in presence of Pankaja Munde)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.