पंकजा मुंडे आठ महिन्यांनी बीडला, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत

भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा यांचं ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात स्वागत केलं (Pankaja Munde Welcomed in beed ).

पंकजा मुंडे आठ महिन्यांनी बीडला, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत


बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. पंकजा तब्बल आठ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात परतल्या आहेत. याच गोष्टीच्या आनंदात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवत, फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं (Pankaja Munde Welcomed in beed ).

भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांचं जालना-बीड सीमेवर जंगी स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. याशिवाय मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. याचंदेखील भान कार्यकर्त्यांना राहिलं नाही (Pankaja Munde Welcomed in beed )..

सावरगावचा दसरा मेळावा होणारच : पंकजा

दरम्यान, बीड जिल्ह्यात सावरगाव येथे दरवर्षी होणारा दसरा मेळावा होणारच. पण यावर्षी हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होईल, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वांनी घरामधूनच दर्शन घ्यावं, असं आवाहन पंकजा यांनी केलं आहे.

सावरगाव येथे भगवान भक्तीगडावर दरवर्षी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. पण कोरोना संकटामुळे यावर्षीचा मेळावा ऑनलाईन होणार आहे. पंकजा आपल्या समर्थकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. त्यामुळे गडावर कुणीही गर्दी करु नका, घरातून दर्शन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI