भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे खंडणीची मागणी, चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली (Pimpari-Chinchwad Chandrakant Patil demand take action) आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे खंडणीची मागणी, चंद्रकांत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
Follow us
| Updated on: Jul 21, 2020 | 11:19 PM

पिंपरी चिंचवड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीस लवकरात लवकर अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Pimpari-Chinchwad Chandrakant Patil demand take action against demand money from hospital)

“पिंपरी-चिंचवडमध्ये माझ्या नावाचा वापर करुन खंडणी मागितल्याची घटना समोर आली. त्यासंदर्भात सर्व कायदेशीर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची गंभीर दखल घ्यावी. संबंधितांस त्वरित अटक करुन कठोर कारवाई करावी,” अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“कोरोना संकटात काहीजण गैरफायदा घेत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि कोथरुड मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला. माझ्या नावाचा गैरवापर करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला. याविरोधात आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.‌ तर कोथरुड स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मी स्वत: पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.”

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी-चिंचवडमधील एका रुग्णालयाला आज भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने धमकी देणारा फोन करण्यात आला. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास तुमच्याकडे बघून घेऊ, असा धमकीवजा इशारा देणारा फोन एका रुग्णालयाला करण्यात आला.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

यानंतर संबंधित रुग्णालय प्रशासनाने थेट चंद्रकांत पाटील यांच्याशी सपंर्क साधला. मात्र त्यांनी आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशाप्रकारे फोन केला नसल्याचे सांगत पोलीस तक्रार देण्यास सांगितलं. त्यानुसार पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Pimpari-Chinchwad Chandrakant Patil demand take action against demand money from hospital)

संंबंधित बातम्या : 

Devendra Fadnavis | फडणवीसांनी महाराष्ट्राचे आकडे मांडले, कमी चाचण्यांमुळे संसर्ग आणि मृत्यू वाढल्याचा दावा

Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.