AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | फडणवीसांनी महाराष्ट्राचे आकडे मांडले, कमी चाचण्यांमुळे संसर्ग आणि मृत्यू वाढल्याचा दावा

कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रुग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख फडणवीसांनी मांडला आहे.

Devendra Fadnavis | फडणवीसांनी महाराष्ट्राचे आकडे मांडले, कमी चाचण्यांमुळे संसर्ग आणि मृत्यू वाढल्याचा दावा
| Updated on: Jul 21, 2020 | 7:38 PM
Share

मुंबई : कमी चाचण्यांमुळेच सातत्याने कोरोना संसर्ग वाढत असून (More COVID-19 Test Needed), मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे (More COVID-19 Test Needed).

कोरोना चाचण्या, त्यातून येणारे पॉझिटिव्ह रुग्ण, दैनंदिन संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण याचा मुंबई आणि महाराष्ट्राचा आलेख फडणवीसांनी मांडला आहे. दिल्लीत केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर आणि तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यानंतर तेथे रुग्णसंख्या, मृत्यूचे प्रमाण आणि संसर्गाचा दैनंदिन दर याचे कमी होत असलेले प्रमाण हेही 8 जूनपासूनची दैनंदिन स्थिती दाखवित देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले? महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17-18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्क्यावर पोहोचला आहे. अर्थात 100 चाचण्यांमधून 24 जणांना कोरोनाचे निदान होते. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी आहे. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ 5,500 चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोनाबळींची संख्या दररोज सरासरी तेवढीच राहत आहे” (More COVID-19 Test Needed).

“नवी दिल्लीतील स्थितीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतरची संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांहून आता 6 टक्क्यांवर आलेला आहे. कोरोना बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आली आहे”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

“मोठ्या प्रमाणात चाचण्यांना दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनावर मात करण्याचा, रुग्णसंख्या कमी करण्याचा आणि राज्यातील नागरिकांचे मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय म्हणजे अधिकाधिक चाचण्या, संशयितांचे विलगीकरण आणि इतरांची सुरक्षा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

More COVID-19 Test Needed

संबंधित बातम्या :

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार

देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचे चार नेते दिल्लीत, फडणवीसांची अमित शाहांशी भेट

CORONA | राज्याची परिस्थिती गंभीर होतेय, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.