देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार

देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं केंद्रातलं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी : विजय वड्डेट्टीवार

फडणवीसांनी त्यांचं वजन वापरुन महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 20, 2020 | 4:27 PM

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी हे वजन वापरुन निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी, असं आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे (Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis and Cyclon relief work). यावेळी त्यांनी विरोधी पक्षाचं काम आरोप करणं असतं. त्याचा खुलासा करण्याची आम्हाला संधी मिळते असं म्हणत फडणवीसांच्या आरोपांना फेटाळलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “आरोप करणं हे विरोधी पक्षनेत्यांचं काम आहे. त्याचा खुलासा करण्याची संधी आम्हाला मिळते. 18 जुलै रोजी फडणवीस यांनी संध्याकाळी आरोप केलाय, आमचा प्रस्ताव सकाळी गेला होता. निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळावी म्हणून राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आहे. 18 जुलै रोजी प्रस्ताव केंद्र सरकारच्या गृहविभागाकडे पाठवला आहे.”

“एनडीआरएफमधून 1 हजार 65 कोटी रुपयांची मदत मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. NDRF च्या नियमानुसार ही प्राथमिक मागणी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी महाराष्ट्राला मदत मिळवून द्यावी.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

‘4 ऑगस्टपासून गडचिरोली-चंद्रपूरमधील शाळा सुरु होणार’

विजय वड्डेट्टीवार यांनी यावेळी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु करणार असल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, “गडचिरोली, चंद्रपूरमध्ये गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. या जिल्ह्यांमध्ये 90 टक्के पालकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यासाठी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेत सॅनिटायझर उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करून दिले जाईल. त्यांना एकमेकांपासून अंतरावर बसवले जाईल आणि शाळा सॅनिटायईज केल्या जातील”

“जिथे कंटेनमेंट झोन आहे, तिथे मात्र शाळा सुरु होणार नाहीत. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील,” असं वडेट्टीवार म्हणाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“निर्यातक्षम उत्पादन क्षेत्र सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. MMR क्षेत्रातील महापालिका वगळून राज्यातील इतर भागातील निर्यातक्षम उद्योग सुरू होणार आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये हे उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल,” असंही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

जनतेने आमदारांना, तर आमदारांनी मला निवडून दिलंय, जयंत पाटलांनी धारिष्ट्य दाखवावं : गोपीचंद पडळकर

Tejas Thackeray | मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र तेजस ठाकरेंच्या दोन सुरक्षारक्षकांना कोरोना

पुण्यात व्हेंटिलेटर नसल्याचा आरोप गिरीश बापटांनी फेटाळला, लॉकडाऊन एकमेव उपाय नसल्याचाही दावा

Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis and Cyclon relief work

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें