PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलं

सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडे फायटर प्लेनस आहेत," असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं. (PM Narendra Modi All Party Meeting)

PM Narendra Modi | एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही, सैन्याला सर्व सूट, आमच्याकडेही Fighter Planes : मोदींनी ठणकावलं

नवी दिल्ली : चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले. “एक इंच जमीनवरही चीनचा कब्जा नाही. सैन्याला सर्व सूट आहे. आमच्याकडेही फायटर प्लेन आहेत,” असे पंतप्रधान मोदींनी चीनला ठणकावलं. (PM Narendra Modi All Party Meeting)

या विषयावर सर्वपक्षीय नेत्यांनी जे विचार मांडले ते फार महत्त्वपूर्ण आहेत. आम्ही देशातील सर्व सीमांचे दिवस-रात्र रक्षण करण्यासाठी सैनिकांसोबत उभे आहोत. वीर जवानांचा भारताला अभिमान आहे. मी शहिदांच्या परिवारांना विश्वास देऊ इच्छितो की, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे.

पूर्व लडाखमध्ये जे काही झालं त्यावर आपलं संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचं मत ऐकलं. आपल्या सीमेत कुणीही आलेलं नाही. आपली कोणतीही फौज दुसऱ्याच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारताकडे शत्रूच्या नजरेने बघितलं, त्यांना शिक्षा देऊन ते अनेक सैनिक अमर झाले. त्यांचं हे शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयांच्या मनात राहील.

चीनने सीमाभागात जे काही केलं आहे, त्यावरुन संपूर्ण देशात त्यांच्याविषयी देशात आक्रोश निर्माण झाला आहे. या चर्चेत सर्व पक्षांच्या नेत्यांनी हे वारंवार स्पष्ट केलं.

आपल्या सैनिकांचे रक्षण करण्यासाठी आपण कोणतीही कसर सोडलेली नाही. Deployment, Action, Counter Action, वायू-लष्कर, नौदल या तिन्ही सेना देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहेत, असेही मोदी म्हणाले.  (PM Narendra Modi All Party Meeting)

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

1. चीनने आपल्या भूमीत कुठलीही घुसखोरी केलेली नाही

2. चीनने आपले कुठलेही तळ ताब्यात घेतलेले नाहीत

3. आपले 20 जवान शहीद पण त्यांनी धडा शिकवला

4. भारताला शांती आणि मैत्री हवीय, पण सार्वभौमत्व सर्वोच्च

5. LAC वर सुविधा वाढवल्यात, आपलं स्थान अधिक भक्कम

6. अगोदर काही ठिकाणी कुणीही यायचं आता जवान चेक करतात

7. आता जवान चेक करत असल्यामुळे काही वेळा तणाव

8. भारत कधीही बाहेरच्या कुठल्याही दबावात येणार नाही

9. योग्य ती कारवाई करण्याचं लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य

10. अगोदर जिथं गस्त व्हायची नाही, तिथे आता आपली गस्त

संबंधित बातम्या : 

PM Modi All Party Meet Live | भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोव्हिड-19 चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी ससून रुग्णालयाला 12 कोटी 44 लाखांचा निधी मंजूर : अजित पवार

Published On - 9:40 pm, Fri, 19 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI