PM Modi All Party Meet Live | भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन दिलं.  (PM Narendra Modi calls All Party Meet India China Face off Live Updates)

PM Modi All Party Meet Live | भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन दिलं.  या बैठकीला 20 राजकीय पक्षांना निमंत्रण होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधानांनी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम असल्याचं विश्वास व्यक्त केला.

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. याआधी ‘कोरोना’ संकट आणि लॉकडाऊनबाबत मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांशी ऑनलाईन चर्चा केली होती. आता चीनला धडा शिकवण्यासाठी राजकीय एकजूट पाहायला मिळाली. (PM Narendra Modi calls All Party Meet India China Face off Live Updates)

PM Narendra Modi Live Update 

  • तुम्ही सर्वांनी तुमचा जो मौल्यवान वेळ दिला, ते काही उपाय सुचवले, यासाठी मी सर्व राजकीय पक्षांचे आभार व्यक्त करतो – पंतप्रधान मोदी
  • आतापर्यंत ज्या लोकांना कोणी विचारत नाही, त्यांना आपले जवान विचारतं आहेत – पंतप्रधान मोदी
  • भारताचं शांतता आणि सौहार्दाला प्राधान्य, भारतीय सेना आमच्या भूमीचं रक्षण करण्यास सक्षम – पंतप्रधान मोदी
  • चीनच्या कृत्याने देशात रोष, वायू, लष्कर, नौदल या तिन्ही सेना सज्ज – पंतप्रधान मोदी
Picture

सर्वपक्षीय बैठक सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

19/06/2020,5:02PM

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी होण्याची चिन्हं आहेत. तर आप, राजद या पक्षांना निमंत्रण दिलेले नाही.

सर्वपक्षीय बैठकीचे कोणाला निमंत्रण?

1. सर्व राष्ट्रीय पक्ष
2. लोकसभेत 5 किंवा त्यापेक्षा जास्त खासदार असणारे पक्ष
3. ईशान्येकडील राज्यांचे प्रमुख पक्ष
4. केंद्रात मंत्री असलेले राजकीय पक्ष
5. 20 पक्षांचे नेते सहभागी होणार
6. केंद्रीय गृह मंत्री, संरक्षण मंत्री, भाजपचे अध्यक्ष सहभागी होणार
7. राजनाथ सिंहांकडून मोदींच्या वतीने सर्व पक्षांना निमंत्रण
8. आप, राजद या पक्षांना निमंत्रण नाही

आमंत्रित पक्ष

भाजप
जनता दल-युनायटेड (जदयु)
लोक जनशक्ती पक्ष (लोजप)
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस
वायएसआर काँग्रेस
तृणमूल काँग्रेस
शिरोमणी अकाली दल
द्रमुक
बिजू जनता दल (बिजद)
तेलंगणा राष्ट्र समिती
तेलुगु देसम पक्ष
बहुजन समाजवादी पक्ष (बसप)
समाजवादी पक्ष (सप)
रिपब्लिकन पक्ष (रिपाइं)
माकप
भाकप
झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो)

(PM Narendra Modi calls All Party Meet India China Face off Live Updates)

कोण हजेरी लावणार?

जे पी नड्डा (भाजप)
नीतीश कुमार (जदयु) <बिहारचे मुख्यमंत्री>
चिराग पासवान (लोजप)
उद्धव ठाकरे (शिवसेना) <महाराष्ट्राचे मुख्यमंत्री>
सोनिया गांधी (काँग्रेस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
वायएस जगन मोहन रेड्डी (वायएसआर काँग्रेस) <आंध्रचे मुख्यमंत्री>
ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस) <प. बंगालच्या मुख्यमंत्री>
सुखबीर बादल (शिरोमणी अकाली दल)
एमके स्टॅलिन (द्रमुक)
नवीन पटनायक (बिजद) <ओदिशाचे मुख्यमंत्री>
पिनाकी मिश्रा (बिजद)
के. चंद्रशेखर राव (तेलंगणा राष्ट्र समिती) <तेलंगणाचे मुख्यमंत्री>
एन. चंद्रबाबू नायडू (तेलुगु देसम पक्ष)
अखिलेश यादव (सप)
सीतीराम येचुरी (माकप)
डी राजा (भाकप)
हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) <झारखंडचे मुख्यमंत्री>

दरम्यान, दिल्लीत सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाला निमंत्रण न दिल्याने आप नेत्यांनी सवाल उपस्थित केले आहेत. निकषानुसार आपचे चारच खासदार असलेले तरी राजधानी दिल्लीमध्ये सरकार असलेल्या पक्षाला बैठकीपासून दूर ठेवणे चुकीचे असल्याची टीका आप खासदार संजय सिंह यांनी केली आहे. तर राजद नेते तेजस्वी यादव यांनीही ट्विटरवरुन मोदी सरकारला सवाल विचारले.

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले आहेत. सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (PM Narendra Modi calls All Party Meet India China Face off Live Updates)

शरद पवारांची प्रतिक्रिया

या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर प्रतिक्रिया दिली. “चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत मी माझं मत मांडलं”, असं शरद पवार म्हणाले.

“चिनी सैन्याने लडाख सीमेवर भारतीय सैन्याने तयार केलेल्या डब्रुक-डीबीओ रोडवर वर्चस्व गाजवण्यासाठी गलवान खोऱ्याच्या मैदानी भागात घुसखोरी केली आहे. चिनी सैन्य कोणत्याही वेळी हा रस्ता बंद करण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेऊ शकते. या रस्त्यासाठी भारतीय लष्कराने प्रचंड पैसे खर्च केले आहेत”, असं शरद पवार म्हणाले.

“चिनी सैनिकांनी भारताच्या हद्दीतील गलवान खोऱ्याच्या उंच भूभागावर कब्जा केला आहे. त्यांनी हा परिसर रिकामा करणं आवश्यक आहे. यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. सीमेवर ताणतणाव कमी करण्यासाठी आणि चीनची समजूत काढण्यासाठी राजकीय रणनिती आखणं जरुरीचं आहे”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *