AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले

कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी मौन सोडले, पहिल्यांदाच कृषी कायद्यावर सविस्तर बोलले
| Updated on: Dec 12, 2020 | 3:50 PM
Share

नवी दिल्ली :  मोदी सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केले जावेत, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अशातच आज (शनिवार) पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांवर आपली सविस्तर भूमिका मांडली. कृषी कायदे देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार गरजेचे असल्याचं सांगत कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रांमधल्या अडचणी दूर होत आहेत ज्याचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. (Pm Narendra Modi on Agriculture Law)

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)च्या 93 व्या वार्षिक बैठकीमध्ये सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी नवीन कायदे देशातील शेतकऱ्यांच्या किती फायदेशीर आहेत, याचा पाढा वाचला. कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित संलग्न क्षेत्रात आतापर्यंत आपण फक्त अडचणीच पाहत आलो आहोत मात्र आता असं होणार नाही. आता आपण सगळ्या अडचणी सोडवत चाललो आहोत, असं मोदी म्हणाले.

कृषी कायद्याने शेतकऱ्यांना मिळणार नवा बाजार

“नव्या कृषी सुधारणांनुसार शेतकऱ्यांना नवा बाजार मिळेल. नवे पर्याय देखील शेतकऱ्यांना आजमावून पाहता येतील. तसंच तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा होईल”, असं मोदी म्हणाले. “देशाचं कोल्ड स्टोरेज आधुनिक असेल. या सगळ्यांमुळे कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक होईल. या सर्वांचा मोठा फायदा देशातील शेतकऱ्याला होईल”, असंही मोदी म्हणाले.

“नव्या कृषी कायद्यानुसार आज भारतातील शेतकऱ्यांकडे आपली पीके मंडीबरोबरच बाहेरच्या बाजारातही विकण्याचा पर्याय आहे. आज भारतामध्ये मंडीचं आधुनिकीकरण होत आहे. शेतकऱ्यांना आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर पीके विकण्याचा आणि खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला गेला आहे”, असं मोदी म्हणाले.

भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट

“कृषी आणि संलग्न क्षेत्रात आज अडचणींच्या भिंती नको तर पुल हवेत जे एकदुसऱ्यांना सपोर्ट करतील. पाठीमागच्या काही वर्षांपासून आपण अनेक अनेक अडचणींवर मात करुन पुढे जात आहोत. त्यामुळे भारताचं कृषी क्षेत्र पहिल्यापेक्षा अधिक वायब्रंट होत चाललेलं आहे”, असं मोदी म्हणाले.

(Pm Narendra Modi on Agriculture Law)

संबंधित बातम्या

Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.