Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून ‘लॉकडाऊन 4’ ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 (Lockdown 4) ची घोषणा केली. (PM Narendra Modi address the nation)

Lockdown 4 : पंतप्रधान मोदींकडून 'लॉकडाऊन 4' ची घोषणा, 18 मे पूर्वी नियम जाहीर करणार
Follow us
| Updated on: May 12, 2020 | 9:04 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. (PM Narendra Modi address the nation)  यावेळी नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 4 ( Lockdown 4) ची घोषणा केली. लॉकडाऊन 4 हा नव्या नियमांसह असेल, त्याचे नियम 18 मे पूर्वी जाहीर करु असं मोदींनी सांगितलं. सध्या चालू असलेला लॉकडाऊन 3 हा 17 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यापूर्वीच मोदींनी लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्वावलंबी भारतचा नारा देऊन, स्वावलंबी भारत अभियानासाठी 20 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. 25 मार्चपासून सुरु झालेला लॉकडाऊन हा 17 मेपर्यंत तीनवेळा वाढवण्यात आला. त्यानंतर आता पुन्हा एकदा या लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. मात्र, ‘लॉकडाऊन – 4’ हा वेगळा असणार आहे. याबाबतच्या नियमांची आणि तारखांची माहिती 18 मेपूर्वी दिली जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. तसेच, 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणाही पंतप्रधान मोदींनी केली.

20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज

कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार मी आज विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करत आहे. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल.

नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या, जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.

देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गींयांसाठी आहे. या आर्थिक पॅकेजबाबत लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल, असं मोदी म्हणाले.

PM Modi LIVE UPDATE  

  • कोरोना आपल्या आयुष्याचा भाग होणार, मास्क घालू, अंतर ठेऊ, आपलं लक्ष्य विसरणार नाही, लॉकडाऊन 4 नव्या नियमांसह असेल, लॉकडाऊन 4 ची माहिती 18 मेपूर्वी दिली जाणार – पंतप्रधान
  • लोकलसाठी व्होकल बना, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, भारतीय उत्पादनं खरेदी करा – पंतप्रधान मोदी
  • सुधारणा राबवणं हे महत्वाचं, सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलोय, कुणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेही त्यावेळेस झालंय ज्यावेळेस सगळं बंद होतं, सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील, कृषी विभागात सुधारणा राबवल्या जातील, टॅक्समध्ये सुधारणा होतील – पंतप्रधान मोदी
  • कुटीर, गृह, लघू उद्योगासाठी पॅकेज, शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं पॅकेज, मध्यमवर्गीयांसाठीही हे पॅकेज महत्वाचं, भारतीय उद्योग जगतासाठीही हे पॅकेज, उद्यापासून ह्या पॅकेजची सविस्तर माहिती, केंद्रीय अर्थमंत्री माहिती देतील –  पंतप्रधान मोदी
  • 2020मधले 20 लाख कोटींचे पॅकेज आत्मनिर्भर भारतास गती देईल – पंतप्रधान मोदी
  • आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पॅकेज विशेष आर्थिक पॅकेज, 20 लाख कोटींचे पॅकेज, हे पॅकेज भारताच्या GDP च्या 10% असेल, पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करेल – पंतप्रधान मोदी
  • पाच स्तंभांवर आत्मनिर्भरतेची इमारत उभी, आत्मनिर्भरतेचा पहिला स्तंभ अर्थव्यवस्था, दुसरा स्तंभ पायाभूत सुविधा, तिसरा स्तंभ तंत्रज्ञानाधारीत व्यवस्था, चौथा स्तंभ आपली भौगोलिकता, पाचवा स्तंभ मागणी-पुरवठ्याचे चक्र – पंतप्रधान मोदी
  • भारताची औषधांनी जगात नवी आशा निर्माण केली, जगभर भारताची प्रशंसा होत आहे, जगाला वाटतंय की भारत खूप चांगलं करु शकतो – पंतप्रधान मोदी
  • भारत आत्मनिर्भर म्हणताना आत्मकेंद्रीततेनं पाहात नाही, ‘जय जगत’ वर भारताचा विश्वास – पंतप्रधान मोदी
  • भारताकडे जग आशेने पाहतंय, वसुधैव कुटुंबकम हा भारताचा आत्मा- पंतप्रधान मोदी
  • अर्थकेंद्रीत वैश्विकरण विरुद्ध मानवकेंद्रीत वैश्विकरणाची चर्चा जोरात आहे – पंतप्रधान मोदी
  • यापूर्वी भारतात पीपीई किट किंवा N95 मास्क बनत नव्हते, मात्र आता 2-2 लाखांचं उत्पादन होत आहे, हे संकटामुळे शक्य झालं, स्वावलंबी होऊ शकलो – पंतप्रधान मोदी

  • स्वावलंबी भारत हेच ध्येय, हाच मार्ग आहे, इतकी मोठी आपत्ती भारतासाठी एक संधी घेऊन आली आहे, – पंतप्रधान
  • 21 वं शतक हे भारताचं आहे हे आपण ऐकत आलो आहे, कोरोना संकटकाळातही जगभरात जी परिस्थिती आहे ते अभूतपूर्व आहे, मात्र 21 वं शतक हे भारताचं असावं हे केवळ स्वप्न नको तर जबाबदारीही हवी – पंतप्रधान

  • कोरोनासारखं संकट कधीही पाहिलं नाही, हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मनुष्याला मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे – पंतप्रधान
  • पंतप्रधान मोदी नेमकी काय घोषणा करणार?
  • देशातील लॉकडाऊन वाढणार की नाही? पंतप्रधान महत्त्वाची घोषणा करणार
  • थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह

मुख्यमंत्र्यांशी संवाद

मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर आता मोदी देशातील जनतेशी संवाद साधला. यापूर्वी मोदींनी तीनवेळा जनतेशी संवाद साधला होता. 22 मार्चच्या जनता कर्फ्यूपूर्वी, 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा करताना, 14 एप्रिलला लॉकडाऊन वाढवताना मोदींनी जनतेशी संवाद साधला होता. मात्र तीन मेनंतर जो लॉकडाऊन वाढला त्यावेळी गृहमंत्रालयाने पत्रक काढून घोषणा केली होती. त्यानंतर आज मोदी कोणती घोषणा करणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.

लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र तिसऱ्या लॉकडाऊनमधल्या निर्बंधांची चौथ्यामध्ये गरज नसेल, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (सोमवारी) झालेल्या बैठकीत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शुक्रवारपर्यंत पुढील लॉकडाऊनची रणनीती देण्यास सांगितले. “माझे ठाम मत आहे, की पहिल्या लॉकडाऊनमधल्या सर्वच निर्बंधांची दुसर्‍या टप्प्यात जशी आवश्यकता नव्हती, त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यात केलेल्या उपायांची चौथ्या टप्प्यात गरज नसेल.” असं नरेंद्र मोदी म्हणाल्याची माहिती आहे.

लॉकडाऊन कसा वाढत गेला? पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका

  • पहिली बैठक – 20 मार्च
  • दुसरी बैठक – 2 एप्रिल
  • दुसरी बैठक – 11 एप्रिल
  • तिसरी बैठक – 27 एप्रिल
  • पाचवी बैठक – 11 मे

PM Narendra Modi to address the nation

संबंधित बातम्या 

लॉकडाऊन वाढवण्याचे पंतप्रधानांचे संकेत, सर्व मुख्यमंत्र्यांना रणनीती आखण्याच्या सूचना 

अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत लोकल सेवा सुरु करा, मुख्यमंत्र्यांची मोदींकडे मागणी

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.