AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांचंही शूटिंग होईल, मोदींकडून विकासाचा शब्द

सुरक्षेचं वातावरण निर्माण झाल्यास काश्मीरमध्ये फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांचीही शुटिंग होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, असं मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. भारतीय सिनेसृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी, असंही आवाहन त्यांनी केलं.

काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांचंही शूटिंग होईल, मोदींकडून विकासाचा शब्द
| Edited By: | Updated on: Aug 09, 2019 | 7:21 AM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आता काश्मीरच्या विकासाचा शब्द दिलाय. जगातलं सर्वात सुंदर पर्यटनस्थळ बनण्याची क्षमता असलेल्या जम्मू काश्मीरचं रुप पालटलं जाईल, वेगाने विकास होईल आणि काश्मिरींचं भविष्य सुरक्षित केलं जाईल, असा शब्द मोदींनी (PM Narendra Modi) दिलाय. सुरक्षेचं वातावरण निर्माण झाल्यास काश्मीरमध्ये फक्त भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांचीही शुटिंग होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल, असं मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. भारतीय सिनेसृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणूक करावी, असंही आवाहन त्यांनी केलं.

“काश्मीरचे तरुण आता नेतृत्त्व करतील”

लडाखचा केंद्रशासित प्रदेश हा दर्जा कायम राहिल, पण जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सामान्य झाल्यास पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. काश्मीरमधील जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळेल. लवकरच पारदर्शी पद्धतीने विधानसभेची निवडणूक होईल आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार मिळेल. काश्मीरच्या युवकाला नेतृत्त्वाची संधीच मिळाली नाही. पण काश्मीरचे तरुण आता नेतृत्त्वही करतील आणि विकासात मोलाचा वाटा उचलतील, असं मोदी म्हणाले.

“अन्याय दूर झाला”

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील काही लोकांना फक्त लोकसभेलाच मतदानाचा अधिकार होता. त्यांना विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करता येत नव्हतं. फाळणीच्या वेळी भारतात आलेले हे लोक आहेत. त्यांच्यावर एवढे वर्ष अन्याय होत राहिला. आता समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल आणि काश्मीरचा युवा देशाच्या विकासात योगदान देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

“प्रत्येक देशभक्ताचं स्वप्न पूर्ण झालं”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी आणि लाखो देशभक्तांचं जे स्वप्न होतं, ते आज पूर्ण झालंय. आता देशातील प्रत्येक नागरिकांना समान हक्क आणि समान कर्तव्य आहेत. एक देश म्हणून, एक परिवार म्हणून आपण सर्वांनी मिळून ऐतिहासिक निर्णय घेतलाय. अशी व्यवस्था ज्यामुळे, लडाख आणि जम्मू काश्मीरमधील नागरिक विकासापासून वंचित होते, ती व्यवस्था आता दूर झाली आहे, असं मोदी म्हणाले.

काही गोष्टी अशा असतात, ज्या कधीच बदलणार नाहीत असं वाटतं. कलम 370 बाबतीतही असंच होतं. कलम 370 मुळे आतापर्यंत काय झालं याबाबत कुणीही विचार केला नाही. कलम 370 आणि कलम 35A चा दहशतवाद, फुटीरतावाद आणि परिवारवादासाठी वापर करण्यात आला. गेल्या तीन दशकात 42 हजार निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागला. आता त्यांचं भविष्य सुरक्षित होईल. या कलमामुळे भ्रष्टाचार पसरला होता, हा नकारात्मक प्रभाव आता दूर होईल, असं मोदी म्हणाले.

“सरकारी कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षा, बेरोजगारांना रोजगार”

आपल्या संसदेने कोणताही कायदा बनवला, तर त्यापासून काश्मीरची जनता वंचित राहत होती. शिक्षणाचा अधिकार काश्मीरच्या मुलांना मिळाला नाही, त्यांनी काय गुन्हा केला होता? सफाई कर्मचाऱ्यांना इतर राज्यात जे अधिकार मिळतात, ते इथे कधी मिळाले नाही. केंद्र सरकारचं वचन आहे, की इतर केद्रशासित प्रदेशांमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना ज्या सुविधा मिळतात, त्या तातडीने लडाख आणि जम्मू काश्मीरसाठीही लागू केल्या जातील. यामुळे त्यांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित होईल, असं मोदींनी सांगितलं.

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या जागा खाली असतील, त्या भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु केली जाईल. यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. अर्धसैनिक दलांमध्ये स्थानिक तरुणांने भरती व्हावं यासाठीही कार्यक्रम हाती घेतला जाईल, असं मोदींनी सांगितलं.

“जगातलं सर्वात सुंदर पर्यटनस्थळ बनण्याची क्षमता”

जम्मू काश्मीरमध्ये जगातलं सर्वोत्कृष्ट पर्यटनस्थळ होण्याची क्षमता आहे. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि विकासालाही चालना मिळेल. देशातील सिनेमांचं शुटिंग मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये केलं जायचं. आता परिस्थिती सामान्य झाल्यास फक्त भारतीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सिनेमांचंही शुटिंग काश्मीरमध्ये होईल, असं म्हणत सिनेसृष्टीने काश्मीरमध्ये गुंतवणुकीबाबत विचार करावा, असंही मोदी म्हणाले.

मोदींचा काश्मीरला शब्द

परिस्थिती सामान्य होताच काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लडाख केंद्रशासित प्रदेशच राहिल.

इतर केंद्रशासित प्रदेशात असलेले सर्व अधिकार काश्मीर आणि लडाखमधील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतील.

जगातलं सर्वात सुंदर पर्यटनस्थळ बनवण्यासाठी पायाभूत सुविधा

काश्मीरच्या तरुणांना क्रीडा क्षेत्रात विकासासाठी चालना, हाताला रोजगार आणि भविष्याची सुरक्षा

क्रीडा क्षेत्रातील तरुण परदेशातही भारताचा झेंडा फडकवतील

सिनेसृष्टीला गुंतवणुकीचं आवाहन

काश्मीरमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार मिळेल, काश्मिरी तरुण आता नेतृत्त्व करतील

पारदर्शक पद्धतीने विधानसभा निवडणूक होईल, लोकांना त्यांचा लोकप्रतिनिधी निवडता येईल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.