नातेवाईकांच्या युनियनबरोबरचा करार अमान्य, ऊसतोड कामगारांनो संप सुरूच ठेवा; आंबेडकरांचं आवाहन

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 29, 2020 | 12:44 PM

प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचं म्हटलं आहे.

नातेवाईकांच्या युनियनबरोबरचा करार अमान्य, ऊसतोड कामगारांनो संप सुरूच ठेवा; आंबेडकरांचं आवाहन
Follow us

पाटणा: ऊसतोड कामगारांच्या झालेल्या कराराला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला आहे. नातेवाईकांच्या युनियनबरोब झालेला हा करार असून हा करार आम्हाला अमान्य आहे. या करारातून ऊसतोड कामगारांच्या हातात काहीच पडणार नाही. या कराराव सह्या झालेल्या नाहीत. त्यामुळे हा करार मान्य करू नका आणि संप सुरूच ठेवा, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. (prakash ambedkar appeal to sugarcane workers to continue strike)

प्रकाश आंबेडकर हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पाटणा येथे आले आहेत. त्यांनी एका व्हिडीओ ट्विटद्वारे ऊसतोड कामगारांसाठी झालेला करार अमान्य असल्याचं म्हटलं आहे. पुण्याच्या साखर संकुलात झालेला करार हा नातेवाईकांच्या युनियन्सनी केलेला करार आहे. हा करार ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि मुकादम या सर्वांच्या विरोधातील आहे. या करारातून काहीही वाढ मिळालेली नाही. या करारावर सह्याही झालेल्या नाहीत. ऊसतोड कामगारांना नुसतंच वापरून घेतलं जात आहे. त्यामुळे करार मान्य करू नका. कामावर जाऊ नका. हा संप वाढवा, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांचा प्रश्न आणखी चिघळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस आदी नेत्यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. त्यात ऊसतोड कामगारांना 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

“ऊस तोड कामगार आणि संघटनांची बैठक पुणे येथे पार पडली. 2020 – 21 ते 2022 ते 2023 असा करार झाला आहे. यावर्षी 14 टक्के वाढ मिळणार आहे. सर्व संघटनांनी संप मागे घेतला आहे. कामगारांनी आपल्याला आपल्या ठरलेल्या कारखान्यांवर कामासाठी जावं”, असं आवाहन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी होतं. (prakash ambedkar appeal to sugarcane workers to continue strike)

संबंधित बातम्या:

ऊसतोड मजुरांना यंदा 14 टक्के वाढ, सर्व संघटनांचे एकमत, पुण्यातील बैठकीत निर्णय

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, दूध दराच्या मुद्द्यावरुन आक्रमक, राज्यपालांना लक्ष घालण्याची विनंती

(prakash ambedkar appeal to sugarcane workers to continue strike)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI