शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अद्याप कुठलीही मदत देण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

सोलापूर: अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक भागात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पण राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अन्यथा भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. (Opposition leader Pravin Darekar warning to state government and cm Uddhav Thackeray)

प्रवीण दरेकर आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी दरेकर यांनी सांगोळगी गावातील परिस्थितीची पाहणी करतानाच, तिथल्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं आहे. पण अद्याप पंचनामे झालेले नाहीत. किंबहुना पंचनाम्याची सुरुवातही झाली नाही. सरकारनं दीर्घकालीन उपाययोजना करावी, पण त्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

फडणवीसांकडून ‘लाव रे तो व्हीडिओ’!

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी फडणवीसांसह सर्वच विरोधी पक्ष, विविध संघटना आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. पण राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही स्वरुपाच्या मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या: 

सायेब, आज तुम्ही मुख्यमंत्री असता तर काय तरी मदत झाली असती; अपसिंगाच्या शेतकऱ्याला फडणवीसांसमोर अश्रू अनावर

जलयुक्त शिवारची चौकशी लावून माझं तोंड बंद करता येईल, हा सरकारचा गैरसमज- फडणवीस

सिबील गेलं खड्ड्यात, अधिकार वापरुन शेतकऱ्यांना कर्ज द्या, कुंभारवाडीतून संभाजीराजेंचा बँक अधिकाऱ्यांना फोन

Opposition leader Pravin Darekar warning to state government and cm Uddhav Thackeray

Published On - 1:40 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI