AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Prithviraj Chavan on Gold statement).

माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही : पृथ्वीराज चव्हाण
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 18, 2020 | 4:25 PM
Share

मुंबई : “माझं ट्विट नीट बघा. मी फक्त मंदिराचं सोनं (Prithviraj Chavan on Gold statement) घेण्याचा उल्लेख केला नव्हता. धार्मिक स्थळांचं सोनं घेण्याचा उल्लेख केला होता. धार्मिक स्थळ म्हणजे फक्त हिंदू धर्माची मंदिरं अशी मानसिकता निर्माण झालेली आहे. माझ्या ट्विटमध्ये मी अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, विपर्यास केला गेला”, असं स्पष्टीकरण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे. त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं (Prithviraj Chavan on Gold statement).

“देशाचा एक नागरिक म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला आहे. मला नागरिक म्हणून पंतप्रधानांना सल्ला देण्याचा अधिकार आहे. धार्मिक स्थळांकडून सोनं कर्ज रुपाने घ्यावं. त्यावर व्याज द्यावं, असा सल्ला दिला होता. धार्मिक स्थळांकडून सक्ती करुन किंवा हिसकावून घ्या, असं मी म्हटलं नव्हतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“भाजपने जाणूनबुजून मंदिराचं सोनं काँग्रेस पक्षाला घ्यायचं आहे, असा विपर्यास केला आहे. ते सोनं मला द्या किंवा काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात द्या, असं मी म्हटलेलं नाही. मी फक्त पंतप्रधान मोदींना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला त्यांनी स्वीकारावा किंवा कचरा पेटीत फेकून द्यावा. मी फक्त सल्ला देण्याचं काम केलं आहे”, असं चव्हाण यांनी सांगितलं.

“मी दिल्लीत संसदेत असताना 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुबॉम्ब चाचणीनंतर जी परिस्थिती निर्माण झालेली त्यावेळी सोनं गोळा केलं होतं. अलिकडेच 2015 साली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोल्ड मॉनिटायझिंग स्कीम म्हणून एक योजना आणली होती. अजूनही ती योजना सुरु आहे. या योजनेमार्फत साडेवीस टन सोनं गोळा झालेलं आहे. मग मी सल्ला दिला म्हणून त्यामध्ये एवढा गदारोळ करण्याचं काय कारण आहे?”, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

“माझं ट्विट स्पष्ट आहे. पण भाजपला गदारोळच करायचा आहे. एक गोष्ट चांगली झाली, आपल्या देशामध्ये हिंदू-मुस्लीम चर्चांच्या पलीकडे चर्चा होऊ लागली. हिंदू धर्मातीलच पुरोगामी आणि प्रतिगामी यांच्यात चर्चा झाली. यामध्ये एक विवेकवादी तर दुसरे रुढीवादी आहेत. अशाप्रकारची चर्चा झाली पाहिजे. हा देश पुढे कुठे जाणार आहे? ते या चर्चेतून निष्पन्न होतं”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

संबंधित बातमी :

मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला, टीका नाही : पृथ्वीराज चव्हाण

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!