Pune Metro | पुण्यात मेट्रोच्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा

पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा झाली (Pune Metro Worker Corona Infected) आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Pune Metro | पुण्यात मेट्रोच्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा

पुणे : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात मेट्रोचे काम करणाऱ्या 17 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्वजण येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमधील कामगार आहे. त्यामुळे पुण्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (Pune Metro Worker Corona Infected)

पुण्यातील अनेक कामगार त्यांच्या गावी गेले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत पुणे मेट्रोचं केवळं 20 ते 30 टक्के काम सुरु आहे. याच मेट्रोचे काम करणाऱ्या एका ठेकदाराकडील 17 कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे सर्व जण येरवडा परिसरातील लेबर कॅम्पमध्ये राहतात.

या कॅम्पमधील 69 कामगार मेट्रोचे काम करतात. त्यातील 17 जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मेट्रो कामादरम्यान नियमित तपासणी सुरु असताना ही बाधा झाल्याचे स्पष्ट झालं आहे. तर उर्वरित 49 कामगारांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान सध्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये 88 कामगार काम करत आहे.

दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य त्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांना प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून आणखी दक्षता घेतली जाणार असल्याचं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे.

हेही वाचा : चिंताजनक! आधी भारताने, आता महाराष्ट्रानेही कोरोना रुग्णसंख्येत चीनला टाकलं पिछाडीवर

महाराष्ट्रात कालच्या दिवसात (रविवार 7 जून) 3007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 85 हजार 975 वर गेला आहे. यापैकी 39 हजार 314 रुग्ण आतापर्यंत उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या राज्यात 43 हजार 591 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी (Pune Metro Worker Corona Infected) दिली.

संबंधित बातम्या : 

राज्यात 60 कारागृहातील कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय, आणखी 7 हजार कैद्यांना सोडणार : गृहमंत्री

पुण्यातील मंचरमध्ये ‘कोरोना’ बचावासाठी शक्कल, ‘छत्री पॅटर्न’ नेमका काय?

Published On - 2:09 pm, Mon, 8 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI