AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भवानी पेठेत 31 नवे कोरोनाग्रस्त, कोथरुडमध्येही नवा रुग्ण सापडला, पुण्याची वॉर्डनिहाय आकडेवारी

भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात तब्बल 31 ने वाढली आहे. इथे आता 245 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. (Pune Bhawani Peth Corona Patients Rise)

भवानी पेठेत 31 नवे कोरोनाग्रस्त, कोथरुडमध्येही नवा रुग्ण सापडला, पुण्याची वॉर्डनिहाय आकडेवारी
| Updated on: Apr 27, 2020 | 7:52 AM
Share

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (26 एप्रिल) 80 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली. यामुळे पुण्यातील एकूण रुग्णांचा आकडा 1 हजार 264 वर पोहचला आहे. तर दिवसभरात पाच कोरोनाग्रस्तांन प्राण गमवावे लागल्याने जिल्ह्यातील ‘कोरोना’बळींचा आकडा 77 झाला आहे. ‘कोरोना’चे केंद्रस्थान असलेल्या भवानी पेठेतील रुग्णसंख्या तब्बल 245 वर गेली आहे. (Pune Bhawani Peth Corona Patients Rise)

पुण्यात सध्या कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 902 इतकी झाली आहे. यापैकी 367 रुग्णांवर नायडू रुग्णालयात, 28 रुग्णांवर ससूनमध्ये, तर इतरांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काल दिवसभरात पुण्यात 6 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. पुण्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 165 झाली आहे.

पुणे शहरात 26 एप्रिलपर्यंत 1149 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1110 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

भवानी पेठेतील रुग्णसंख्या एका दिवसात तब्बल 31 ने वाढली आहे. इथे आता 245 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. भवानी पेठेसह शिवाजीनगर  घोलेरोड, कसबा विश्रामबाग वाडा, ढोले पाटील रोड आणि येरवडा धानोरी या पाच वॉर्डमध्ये रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे. कोथरुड बावधन भागात दुसरा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे, गेले अनेक दिवस इथली रुग्णसंख्या एकावर थोपवण्यात यश आलेल्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढू शकते. तर औंध बाणेर परिसरातही बऱ्याच दिवसांनी नवा रुग्ण आढळला आहे.

भवानी पेठ (31 नवे रुग्ण) आणि येरवडा धानोरी (17) वगळता अन्यत्र एका दिवसात मोठ्या प्रमाणावर रुग्ण न आढळल्याने काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 4 (+1) कोथरुड – बावधन –  2 (+1) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड –  10 (0) शिवाजीनगर – घोलेरोड – 142 (+9) कसबा – विश्रामबाग वाडा – 131 (+4) धनकवडी – सहकारनगर –  61 (+6) भवानी पेठ – 245 (+31) (Pune Bhawani Peth Corona Patients Rise) बिबवेवाडी – 32 (+1) ढोले पाटील रोड –  163 (+3) कोंढवा – येवलेवाडी – 16 (+3) येरवडा – धानोरी – 127 (+17) नगर रोड – वडगाव शेरी – 30 (+1) वानवडी – रामटेकडी – 56 (+2) हडपसर – मुंढवा –  32 (+2) पुण्याबाहेरील – 50 (+1)

(Pune Bhawani Peth Corona Patients Rise)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.