पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’, 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर

भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. कालच्या दिवसात भवानी पेठेत 13 नवे रुग्ण सापडले (Pune Bhawani Peth witness maximum corona deaths)

पुण्यातील भवानी पेठ कोरोनाचे 'डेथ सेंटर', 11 रहिवासी दगावले, रुग्णसंख्या 69 वर

पुणे : पुण्यातील ‘भवानी पेठ’ कोरोनाचे ‘डेथ सेंटर’ ठरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात दगावलेल्या 34 पैकी 11 कोरोनाबाधित भवानी पेठेतील रहिवासी होते. भवानी पेठेतील कोरोनाग्रस्तांची संख्या एका दिवसात (12 एप्रिल) 13 ने वाढून 69 वर पोहोचली आहे. (Pune Bhawani Peth witness maximum corona deaths)

आज पुण्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना बळींची संख्या ही 34 वर येऊन पोहोचली आहे. आज पुण्यात नाना पेठेतील एका 40 वर्षीय पुरुषाचा कोरोनाुळे मृत्यू झाला आहे, तर कोंढवा खुर्द एका 50 वर्षीय महिलेचाही कोरोनाने बळी घेतला आहे.

पुण्यातील कोणत्या वॉर्डमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक (12 एप्रिलपर्यंत) झाला आहे, याची माहिती महापालिकेने जारी केली आहे. भवानी पेठ परिसरात सातत्याने कोरोना रुग्ण आढळत असल्याने इथली रुग्णसंख्या सर्वाधिक राहिली आहे. कालच्या दिवसात भवानी पेठेत 13 नवे रुग्ण आढळल्यामुळे इथल्या कोरोनाग्रास्तांची संख्या 69 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत पुण्यात दगावलेल्या 34 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 11 जण भवानी पेठेतील रहिवासी होते. येरवडा-धानोरी आणि सहकारनगरमध्ये प्रत्येकी 3 तर मुंढव्यातही आतापर्यंत कोरोनाचे 3 बळी गेले आहेत. ढोले पाटील, बाणेरमध्ये प्रत्येकी दोन कोरोनाग्रस्त मृत्युमुखी पडले आहेत.

कुठे किती मृत्यू? (12 एप्रिलपर्यंत)

भवानी पेठ – 11 येरवडा – धानोरी – 3 धनकवडी-सहकारनगर – 3 हडपसर -मुंढवा – 3 ढोले पाटील रोड- 2 पुण्याबाहेर – 2 औंध – बाणेर 1 कसबा विश्रामबाग वाडा – 1 बिबवेवाडी – 1 कोंढवा – येवलेवाडी – 1 वानवडी-रामटेकडी – 1 कोंढवा खुर्द – 1 नाना पेठ – 1

एकही ‘कोरोना’बळी न गेलेले विभाग

कोथरुड – बावधन सिंहगड रोड वारजे – कर्वेनगर शिवाजीनगर – घोले रोड नगररोड – वडगावशेरी

(Pune Bhawani Peth witness maximum corona deaths)

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ)

औंध – बाणेर – 3 कोथरुड – बावधन – 1 सिंहगड रोड – 5 वारजे कर्वेनगर – 1 शिवाजीनगर – घोलेरोड – 11 (+4) कसबा – विश्रामबागवाडा – 33 (+4) धनकवडी – सहकारनगर – 19 (+5) भवानीपेठ – 69 (+13) बिवबेवाडी – 10 (+2) ढोले पाटील रोड – 31 (+3) येरवडा – धानोरी – 16 (+7) नगररोड – वडगावशेरी – 3 वानवडी – रामटेकडी – 10 (+2) हडपसर – मुंढवा – 21 कोंढवा – येवलेवाडी – 8 पुण्याबाहेरील रुग्ण – 12

हेही वाचा : ‘कोरोना’बाधिताचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवणार नाही, पुणे विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय

(Pune Bhawani Peth witness maximum corona deaths)

Published On - 6:30 pm, Mon, 13 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI