AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हॉटस्पॉट’ भवानी पेठेत 168 कोरोनाग्रस्त, पुण्यातील वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजे 168 रुग्ण आहेत, तर कोथरुड बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आहे. (Pune Corona Hot spot Ward wise Patients)

'हॉटस्पॉट' भवानी पेठेत 168 कोरोनाग्रस्त, पुण्यातील वॉर्डनिहाय रुग्णसंख्या
| Updated on: Apr 22, 2020 | 9:14 AM
Share

पुणे : पुणे शहरात 21 एप्रिलपर्यंत 711 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. यामध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत तब्बल 168 रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 696 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. (Pune Corona Hot spot Ward wise Patients)

पुण्यात ‘कोरोना’बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. भवानी पेठेत सर्वाधिक म्हणजे 168 रुग्ण आहेत, तर कोथरुड बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आहे. कसबा विश्रामबाग वाडा भागातील रुग्णसंख्याही शंभरीपार गेली आहे. इथे 102 रुग्ण आहेत, तर ढोले पाटील रोडवरील कोरोनाग्रस्त रुग्ण शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. इथे 97 कोरोनाबाधित सापडले आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या

औंध – बाणेर – 2 कोथरुड – बावधन – 1 वारजे – कर्वेनगर – 8 सिंहगड रोड – 8 शिवाजीनगर – घोलेरोड – 59 कसबा – विश्रामबाग वाडा – 102 धनकवडी – सहकारनगर – 38 भवानी पेठ – 168 बिबवेवाडी – 24 ढोले पाटील रोड – 97 कोंढवा – येवलेवाडी – 10 येरवडा – धानोरी – 68 नगर रोड – वडगाव शेरी – 16 वानवडी – रामटेकडी – 32 हडपसर – मुंढवा – 26 पुण्याबाहेरील – 37

पुण्यात 21 तारखेपर्यंत 51 रुग्णांचा मृत्यू झाल्याची पालिकेकडे नोंद आहे. त्यापैकी 50 मृतांचा नकाशाच्या माध्यमातून आढावा घेतला आहे. कोरोनाचे ‘डेथ सेंटर’ म्हणवल्या गेलेल्या भवानी पेठेत आतापर्यंत पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासा हाच की गेल्या पाच दिवसात भवानी पेठेतील मृतांचा आकडा पंधरावर थांबला आहे.

हेही वाचा : मुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय

वॉर्ड – ‘कोरोना’ बळी (Pune Corona Hot spot Ward wise Patients)

औंध – बाणेर – 0 कोथरुड – बावधन – 0 वारजे – कर्वेनगर – 1 सिंहगड रोड – 0 शिवाजीनगर – घोलेरोड – 4 कसबा – विश्रामबाग वाडा – 6 धनकवडी – सहकारनगर – 2 भवानी पेठ – 15 बिबवेवाडी – 2 ढोले पाटील रोड – 3 कोंढवा – येवलेवाडी – 1 येरवडा – धानोरी – 3 नगर रोड – वडगाव शेरी – 0 वानवडी – रामटेकडी – 6 हडपसर – मुंढवा – 5 पुण्याबाहेरील – 2

(Pune Corona Hot spot Ward wise Patients)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.