Corona | पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर, मुंबईसह महाराष्ट्रालाही मागे टाकलं

Corona | पुण्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांवर, मुंबईसह महाराष्ट्रालाही मागे टाकलं
sassoon hospital, pune

मुंबईपाठोपाठ कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक ठरला आहे.. (Pune Corona Recovery rate Highest in India)

Namrata Patil

|

Oct 13, 2020 | 10:16 AM

पुणे : मुंबईपाठोपाठ कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक ठरला आहे. पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. विशेष म्हणजे पुण्याने मुंबई आणि महाराष्ट्रालाही मागे टाकलं आहे. (Pune Corona Recovery rate Highest in India)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात येत आहे. तसेच कोरोना झालेले रुग्णांची रिकव्हरीही चांगल्या पद्धतीने होत आहे. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट हा 15.8 टक्क्यांवर गेला आहे. तर रिकव्हरी रेट हा 89.6 टक्के इतका झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी झाला आहे.

सद्यस्थितीत भारताचा कोरोना रिकव्हरी रेट हा 86 टक्के, तर महाराष्ट्र राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट हा 82 टक्के इतका आहे. तसेच मुंबईच्या तुलनेनेही पुण्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे.

दरम्यान काल (12 ऑक्टोबर) पुण्यात 351 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 950 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा चढता आलेख घसरला असल्याचं बोललं जात आहे. सद्यस्थितीत पुणे शहरात 12 हजार 285 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सोमवारी दिवसभरात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 856 गंभीर रूग्णांवर उपचार सुरू आहेत.(Pune Corona Recovery rate Highest in India)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 1 कोटी रुपये रुग्णांना परतवले, मनसेच्या पाठपुराव्याला यश

आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें